अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय

Assembly proceedings विधानसभा कामकाज हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या हडपसर न्युज Hadapsar Crime News Hadapsar Marathi News Hadapsar News

The decision to increase the salary of Anganwadi workers, helpers

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय

– महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Assembly proceedings विधानसभा कामकाज हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या हडपसर न्युज Hadapsar Crime News Hadapsar Marathi News Hadapsar Newsमुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अतुल भातखळकर, आदिती तटकरे यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, अंगणवाड्यांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नवीन मोबाईल खरेदीही करण्यात येत आहे. या मोबाईल ॲप मध्ये ‘ट्रॅक ॲप’ आहे त्यामध्ये माहिती अद्ययावत करत असताना नाव इंग्रजीत भरले असले, तरीही उर्वरित सर्व माहिती मराठीमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *