अण्वस्त्रांचा प्रसार आणि अणुयुद्धाची शक्यता रोखण्यावर जगातल्या अण्वस्त्रधारी ५ महासत्तांची सहमती.
रशिया: अण्वस्त्रांचा प्रसार आणि अणुयुद्धाची शक्यता रोखण्यावर जगातल्या अण्वस्त्रधारी ५ महासत्तांची सहमती झाली आहे.
अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या पाच महासत्तांनी रशियात क्रेमलिन इथं एकत्र येऊन संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं. त्यानुसार या देशांनी जगात सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी इतर देशांबरोबर काम करणं आपलं प्रथम कर्तव्य मानलं आहे. आपसातला विश्वास बळकट करण्यासाठी तसंच शस्त्रास्त्र स्पर्धा कमी करण्याच्या दृष्टीने या निवेदनाचा उपयोग होईल असं चीनचे परराष्ट्र खात्याचे उपमंत्री मा झाओक्सू यांनी म्हटलं आहे.
अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचं चीनचं धोरण कायम असल्याचं त्यांनी सांगितलं.शस्त्रास्त्र नियंत्रण आणि निःशस्त्रीकरणाचा निर्धार या निवेदनातून व्यक्त होत असल्याचं फ्रान्सने म्हटलं आहे.