अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या ‘निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Women’s security strengthened by ‘Nirbhaya’ teams preventing atrocities on the spot – CM Uddhav Thackeray.

अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या ‘निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

मुंबईतील महिलांना आता ‘निर्भया’ पथकाचे सुरक्षा कवच; 103 क्रमांक डायल करून निर्भया पथकाची मदत घेता येणार.

मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निर्भया पथक, निर्भया सक्षम केंद्र आणि संबंधित इतर उपक्रमांचं उद्घाटन केलं. राज्याचं पोलीस दल कौतुक करावं, असं काम करतWomen's security strengthened by 'Nirbhaya' teams preventing atrocities on the spot - CM Uddhav Thackeray. असल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याचं ते म्हणाले. महिला आणि राज्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हणत प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत असलेल्या महिला असहाय्य राहू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करायची गरजही त्यांनी व्यक्त केली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आज निर्भया पथक आणि महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे विविध उपक्रम सुरु करून मुंबई पोलिसांनी एक स्तुत्य काम केले आहे. त्याबद्दल गृहमंत्री आणि मुंबई पोलीस दलाचे विशेष कौतुक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करत आहेत, विविध क्षेत्रात त्यांची ही घोडदौड सुरु असताना समाजातील सामान्यातल्या सामान्य महिलेला सुरक्षितता पुरवणे गरजेचे आहे. एखादी घटना घडते, त्या काळापुरता हल्लकल्लोळ माजतो परंतु नंतर काही काळाने सगळे थंड होते,  महिला सुरक्षितता हा विषय फक्त त्या दिवसापुरता चर्चेत राहतो. असे होता कामा नये.

पोलीस दल सक्षम करण्याच्या कामात सरकार कुठेही मागे राहणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मंत्री, तसंच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळे चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी निर्मिती केलेल्या निर्भया थीमचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झालं. १०३ हा मदत क्रमांक डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळेल. यासाठी पथकातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना डेटा सुविधासह फोन उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *