Permission to Anuradha College of Nursing to increase admission.
अनुराधा कॉलेज ऑफ नर्सिंगला प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास परवानगी.
मुंबई :बीडच्या चिखली येथील परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या अनुराधा कॉलेज ऑफ नर्सिंगला पदवी अभ्यासक्रमासाठी (बी.एस्सी. नर्सिंग) ( B Sc. Nursing Course)सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशक्षमता वाढ 30 वरुन 50 करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
सन 2021-22 पासून या महाविद्यालयातील बी.एस्सी नर्सिंग या पदवी ( B Sc. Nursing Degree)अभ्यासक्रमाची विद्याथी प्रवेशक्षमता 50 इतकी राहील.
सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता ( B Sc. Nursing Admission)निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने नर्सिंग अभ्यासक्रमाच्या ( B Sc. Nursing Degree )महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे.
महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.