अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहिम

अन्न पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहिम.

पुणे :- दिवाळी सणात नागरिकाला सुरक्षित, निर्भेळ व सकस अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्यादृष्टीने भेसळ रोखण्यासाठी तपासणी व खाद्यनमुने घेण्याची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.
मिठाई विक्रेते, खवा, मावा, फरसाण उत्पादक यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेवून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. व्यावसायिकांनी मिठाईच्या थाळी (ट्रे) वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा. कच्चे अन्नपदार्थ व खवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावे. अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या विक्री देयकावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत प्राप्त परवानाक्रमांकच नमूद करणे अनिवार्य राहील. पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावेत. कामगारांची त्वचा व संसर्गजन्य रोगांपासून मुक्तबाबतची वैद्यकीय तपासणी करावी.

मिठाई तयार करतांना केवळ फुडग्रे खाद्यरंगाचा १०० पीपीएमच्या आतच वापर करावा. बंगाली मिठाई ८ ते १० तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरियलवर निर्देश देण्यात यावेत. खास (स्पेशल)बर्फीचा वापर मिठाई बनविण्यासाठी करू नये. माशांचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून जाळीदार झाकणे, बंदिस्त शोकेस असावे. स्वतःचे व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे.
मिठाई फरसाण तयार करतांना वापरण्यात येणारे खाद्यतेल हे दोन ते तीन वेळाच वापरण्यात यावे. त्यानंतर ते पुर्नवापर केलेले खाद्यतेल नियमांतर्गत बायोडिझेल कंपन्यांना देण्यात यावे. मिठाईचे घटकपदार्थांचा तपशील मिठाईच्या ट्रे वर अथवा आस्थापनेच्या दरपत्रकामध्ये किंवा आस्थापनेमध्ये दर्शनी भागावर लावावा. कोविड विषयक नियमांचे पालन करावे.

नागरिकांनी मिठाई दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करतांना फक्त परवानाधारक आस्थापनांकडून खरेदी करावी. मिठाई दुध व दुग्धजन्यपदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावे. खरेदी करतांना वापरण्यायोग्य दिनांक पाहूनच खरेदी करावे.

उघड्यावरील तसेच फेरीवाल्याकडून मिठाई, खवा (मावा) खरेदी करु नये.

माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे शक्यतो २४ तासाच्या आत सेवन करावे तसेच त्यांची साठवणूक योग्य तापमानात (फ्रिजमध्ये) करावी. बंगाली मिठाई ८ ते १० तासाच्या आत सेवन करावी. मिठाईवर बुरशी आढळल्यास त्याचे सेवन करू नये, खराब किंवा चवीत फरक जाणवला तर मिठाई नष्ट करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे‍ विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.
व्यावसायिक व ग्राहकांनी अधिक माहितीसाठी प्रशासनाच्या टोल फ्री १८००२२२३६५ किंवा कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक ०२०-२५८८२८८२ यावर संपर्क साधण्याचे आवाहनही अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.*

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *