अन्न सुरक्षेमध्ये कृषी संशोधनाचे महत्वपूर्ण योगदान.

जी -20 च्या कृषी मंत्र्यांच्या बैठकीला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आभासी माध्यमातून उपस्थित.

अन्न सुरक्षेमध्ये कृषी संशोधनाचे महत्वपूर्ण योगदान – केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर

जी -20 चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या इटलीने आयोजित केलेल्या जी-20 च्या कृषी मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री  श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आभासी माध्यमारून सहभाग घेतला. ”शाश्वततेच्या  मागे एक प्रेरक शक्तीच्या रूपात  संशोधन” या विषयावरील सत्राला संबोधित करताना श्री तोमर म्हणाले की, अन्नसुरक्षेच्या समस्येवर मात करण्यासह शेतकऱ्यांच्या आणि कृषकांच्या उत्पन्नात सुधारणा करण्यासाठी आणि लोकांच्या उदरनिर्वाहासाठी नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करण्याच्या दृष्टीने, कृषी संशोधनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.उपलब्धता, पोच आणि किफायतशीर या अन्न सुरक्षेच्या तीन पैलूंमध्ये संशोधनाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. Union Minister of Agriculture and Farmers Welfare, Shri Narendra Singh Tomar

भारतातील कृषी संशोधनाने देशाला अन्नधान्य आयातदार  ते निर्यातदार बनवण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. मातीची उत्पादकता सुधारण्यासह साठवणुकीसाठी पाणी व्यवस्थापन, विस्तार आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी  तंत्र आणि पद्धतींचे पॅकेज एकात्मिक संशोधन प्रयत्न विकसित करू शकतात.  तंत्रज्ञानाची प्रगती ही मानवजातीसमोरील आव्हाने सोडवण्याची गुरुकिल्ली आहे.आज, 308 दशलक्ष टन अन्नधान्याच्या वार्षिक उत्पादनासह, भारत केवळ अन्नसुरक्षेच्या क्षेत्रातच नाही तर इतर देशांच्या गरजाही भागवत आहे, असे केंद्रीय मंत्री श्री. तोमर यांनी सांगितले.

श्री तोमर म्हणाले की, देशाला आत्मनिर्भर  करण्याच्या प्रयत्नांमध्ये  जीनोमिक्स, डिजिटल शेती, हवामान-स्मार्ट तंत्रज्ञान आणि पद्धती, कार्यक्षम पाणी वापर उपकरणे, उच्च उत्पन्न देणाऱ्या आणि जैव अनुकूल वाणांचा विकास, योग्य पद्धतीने उत्पादन, गुणवत्ता आणि सुरक्षा मानके यासंदर्भात कृषी संशोधनात एकत्रित प्रयत्न सुरूच राहतील. पर्यावरणीय शाश्वततेसह पुरेसे आणि पौष्टिक अन्न मिळवण्यासाठी वैज्ञानिक संशोधनातील वाढत्या गुंतवणुकीसह कृषी संशोधन आणि विकासाचा  पुनर्विचार करण्याची आणि अनुकूल करण्याची  गरज आहे.  या दिशेने काम करत, आम्ही विविध पिकांच्या 17 जाती विकसित आणि सोडल्या आहेत जे जैविक आणि अजैविक ताणांना प्रतिरोधक आहेत. त्याचप्रमाणे, आयसीएआर लोकांच्या पौष्टिक गरजांची पूर्तता करण्यासाठी बायो-फोर्टिफाइड वाण विकसित करत आहे. शाश्वत शेतीवर राष्ट्रीय मिशन सुरू करण्यात आले आहे जे शेतीत एकात्मिक शेती प्रणालीच्या दृष्टिकोनाला प्रोत्साहन देते. सर्वोत्तम प्रोत्साहनांच्या देवाणघेवाणात, संशोधन आणि विकासात आणि कृषी मूल्य साखळीच्या विकासाद्वारे उत्पादकता वाढवण्यासाठी प्रोग्रामॅटिक हस्तक्षेप, लोकांच्या फायद्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी भारत आपले प्रयत्न सुरू ठेवेल.

श्री तोमर व्यतिरिक्त, भारतीय शिष्टमंडळात डॉ.अभिलाक्ष लिखी, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, सहसचिव सुश्री अलकनंदा दयाल, डॉ बी राजेंद्र आणि भारतीय दूतावासातील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *