5G internet service in the US started yesterday.
अमेरिकेत 5 जी इंटरनेटसेवा कालपासून सुरु.
अमेरिकेत 5 जी इंटरनेटसेवा कालपासून सुरु झाली. त्या शक्तिशाली लहरींमुळे विमान वाहतुकीवर परिणाम होईल या भीतीने अनेक विमान कंपन्यांनी अमेरिकेतली उड्डाणं रद्द केली होती.
विमानकंपन्या आणि 5 जी सेवापुरवठादार कंपन्यांदरम्यान झालेल्या चर्चेनुसार काही विमानतळांजवळचे 5 जी मनोरे कार्यान्वित करण्याची वेळ पुढं ढकलण्यात आली.
मात्र एयर इंडीयासहित जगभरातल्या अनेक विमान कंपन्यांनी आपापली उड्डाणं स्थगित किंवा रद्द केली होती.
यापुढंही सावधपणानेच विमानवाहतूक चालवण्याचा इरादा कंपन्यांनी जाहीर केला आहे.