The Ahmednagar district will be renamed Ahilyanagar
अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात येणार
छ. संभाजीनगर नंतर आता अहिल्यानगर… अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
चौंडी : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशीव केल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानंतर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंती उत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अहिल्यादेवी होळकर यांनी समाजातल्या सर्व स्तरातल्या जनतेच्या कल्याणासाठी काम केलं. प्रशासकीय कारभाराचा उत्तम धडा त्यांनी दिला, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आहिल्यादेवी होळकर यांचे नाव हिमालयाएवढे आहे. अहिल्यादेवी यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी खूप काही केलं. अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. आमच्या सरकारच्या काळात अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय होणार असल्याने हे आमचं भाग्य आहे. आजच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आम्हाला भाग्य मिळाले. ज्यांनी इथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना 20 दिवसात सत्तेतून घालवून टाकण्याचे काम आम्ही केलं.”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्याच्या १४ तालुक्यातल्या महिलांना राजमाता अहिल्यादेवी सन्मान प्रदान करण्यात आला. अहिल्यादेवी महामंडळाला राज्य सरकारच्या वतीने दहा कोटी रुपये देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर असं करण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, राजामाता अहिल्यादेवी खऱ्या अर्थाने धर्मरक्षक होत्या. त्यांनी अनेक मंदिरे वाचविली. खऱ्या अर्थाने त्यांनी धर्मरक्षणाचे काम केले. त्यांचे नाव या जिल्ह्याला दिले पाहिजे, अशी मागणी होत आहे.आहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी दिसली नसती, आहिल्यादेवी यांनी कधीही भेदभाव केला नाही.
सरकारने धनगरांसाठी विविध योजनांना मंजुरी दिली आहे. विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी केली होती.
चौंडी हे आहिल्याबाई होळकरांचं जन्मगाव असून तिथं जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आहिल्याबाईंच्या प्रतिमेला काल मध्यरात्रीनंतर १ वाजता सात नद्या आणि बारवातल्या पाण्याने अभिषेक करण्यात आला. त्यांनतर पहाटे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी अहिल्याबाई होळकर यांची पूजा केली.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राम कदम यांनी गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करावं, अशी मागणी केली होती. तसेच मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही अहमदनगरच्या नामांतराची मागणी राज्य सरकारकडे केली होती.
अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा यामागणीसाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती (ठाणे) तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला. सीना नदी काठी वसलेल्या या गावात धनगर समाजाचे दैवतांचा जन्म झाल्याने ती भूमी पवित्र झाली आहे. त्यामुळे अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथुन आहिल्या नगर नामांतरसाठी रथयात्रा काढण्यात आली होती.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com