आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सुधारित नियमावली जारी.

Revised regulations issued by the Union Ministry of Health for international travellers.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सुधारित नियमावली जारी.

नवी दिल्ली : केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी मार्गदर्शक तत्वं जारी केली असून त्याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. त्यानुसार येणाऱ्या प्रवाशांना तसचं सर्वMinistry Health and Family Welfare विमान कंपन्यांना आणि देशातल्या प्रवेशाच्या प्रत्येक केंद्रावर कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

धोकादायक देशांमधून आलेल्या आणि कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या प्रवाशांचं नियमांनुसार विलगीकरण केलं जाणार असून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल होणं बंधनकारक राहणार नाही. या देशातून आलेल्या प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचा निकाल येईपर्यंत विमानतळावरच थांबावं लागणार असून ती चाचणी नकारात्मक आल्यानंतरच त्यांना विमानतळाबाहेर किंवा दुसरं विमान पकडण्यासाठी जाता येणार आहे.

५ वर्षापेक्षा लहान असणाऱ्या मुलांना या कोणत्याही प्रकारच्या चाचणीतून वगळलं आहे. धोकादायक नसलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांपैकी त्या विमानातून आलेल्या केवळ दोन टक्के प्रवाशांची नमुना चाचणी केली जाणार आहे. आधीचे काही नियम कायम ठेवले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *