आठवड्यातील महत्वाच्या बातम्या –

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी.

राज्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती.

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये १७ हजार ३७२ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयम् वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

 

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी.

 

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असल्याचे कळविले आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया 31 ऑगस्ट 2021 पर्यंत थांबविण्यात आल्या होत्या. शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेवरील स्थगिती दि. 31 ऑगस्ट 2021 च्या पुढे वाढविलेली नसल्यामुळे प्राधिकरणाने दि. 20 सप्टेंबर 2021 पासून प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी पारीत केले आहेत. असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण विभागाचे सचिव यशवंत गिरी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु.

दीर्घकालीन कोविड असलेल्या रुग्णांसाठी अस्थिरोगतज्ञांकडून लक्षणे आणि इतर मार्गदर्शन.

“गंभीर स्वरूपाच्या कोविड-19 संसर्गातून बरे झाल्यावर लगेचच अधिक व्यायाम करु नये”.Covid-19-Pixabay-Image

जगभरात अद्यापही अनेक ठिकाणी कोविडशी लढा देणे सुरूच असतांना या संदर्भात आणखी एक शब्द सध्या सातत्याने ऐकू येत आहे, ती म्हणजे, ‘दीर्घकालीन कोविड’ सध्या, होत असलेला हा कोविडचा प्रकार, डॉक्टर आणि रुग्ण दोघांसाठीही चिंतेचा विषय ठरला आहे. नवी दिल्लीतील, सेंट स्टिवन रुग्णालयात अस्थिरोग चिकित्सा विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ मॅथ्यू वर्गीस यांनी ट्वीटरवर कोविडनंतर येणाऱ्या शारीरिक समस्यांविषयी माहिती देतांना पहिल्यांदा ( लॉन्ग कोविड) हा शब्दप्रयोग केला. रुग्ण कोविडमधून बरा झाल्यानंतर, त्याला हा संसर्ग झाल्याच्या चार ते पाच आठवड्यानंतर अशी लक्षणे दिसू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

लॉन्ग- म्हणजेच दीर्घकालीन कोविड म्हणजे नेमके काय?

लॉन्ग- म्हणजेच दीर्घकालीन कोविड म्हणजे नेमके काय?

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषांतर सॉफ्टवेअर प्रकल्प ‘उडान’.

‘उडान’ प्रकल्पाद्वारे डोमेन आणि भाषा तज्ज्ञांच्या चमूला प्रत्यक्षात भाषांतरासाठी लागणाऱ्या वेळेच्या एक षष्ठांश वेळेत अभियांत्रिकी पाठ्यपुस्तके/शिक्षण सामुग्रीचे भाषांतर होऊ शकते: आयआयटी मुंबई.

14 सप्टेंबर जो दरवर्षी हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या दिवशी आयआयटी मुंबईच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक गणेश रामकृष्णन आणि त्यांच्या चमूने ‘उडान’ प्रकल्पाचा शुभारंभ केला, ज्यामुळे इंग्रजीतून हिंदी आणि सर्व भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकीमधील पाठ्यपुस्तके आणि शिक्षण सामुग्रीचे तसेच उच्च शिक्षणातील सर्व मुख्य प्रवाहातील भाषांतर सुलभ होणार आहे. https://www.udaanproject.org/ आभासी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. कृष्णस्वामी विजयराघवन उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषांतर सॉफ्टवेअर प्रकल्प ‘उडान’.

महत्वपूर्ण पाऊल उचलत भारताच्या पीसीआयएम अ‍ॅन्ड एच आणि अमेरिकी हर्बल फार्माकोपिया यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या.

आयुर्वेदिक आणि इतर पारंपारिक भारतीय औषध उत्पादनांची गुणवत्ता जागतिक स्तरावर, विशेषकरून अमेरिकी बाजारपेठेत बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या निर्यातीच्या संधी वृद्धींगत करण्यासाठी आयुष मंत्रालयाने महत्वाचे पाऊल उचलत यासाठी मार्ग मोकळा केला आहे. यासंदर्भात फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन  अ‍ॅन्ड होमिओपॅथी आणि अमेरिकन हर्बल फार्माकोपिया यांच्यात 13 सप्टेंबर 2021 ला सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दुरदृष्य प्रणालीद्वारे या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशात परस्पर लाभदायी आणि समानता या आधारावर आयुर्वेद आणि इतर भारतीय पारंपारिक औषध प्रणालीला प्रोत्साहन, मानक विकास आणि बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने आयुष मंत्रालयाने हा करार केला आहे.

 

भारताच्या पीसीआयएम अ‍ॅन्ड एच आणि अमेरिकी हर्बल फार्माकोपिया यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या.

अँपलने केले आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्सचे अनावरण .Apple_iPhone-13-Pro_iPhone-13-Pro-Max_

  •  पूर्वीपेक्षा अधिक प्रो आयफोनवरील सर्वात प्रगत प्रो कॅमेरा प्रणाली;
  • प्रो मोशनसह सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले; 
  • बॅटरीच्या आयुष्यात मोठी वाढ 
  • A15 बायोनिक, स्मार्टफोनमधील सर्वात वेगवान चिप;
  • प्रगत 5G अनुभव; आणि बरेच काही.
  • Apple.com/in/store वरून ग्राहकांना iPhone 13 Pro INR 119900 आणि iPhone 13 Pro Max INR 129900 मध्ये मिळू शकते.
  • प्री-ऑर्डर शुक्रवार, 17 सप्टेंबरपासून सुरू होते, उपलब्धता शुक्रवार, 24 सप्टेंबरपासून सुरू होते.

अँपलने केले आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्सचे अनावरण .

 

वस्तू आणि सेवा कर मंडळाने घेतलेले काही लोककेंद्रित निर्णय.

वस्तू आणि सेवा कर मंडळाच्या 45 व्या बैठकीतील शिफारसी.Goods & Service Tax

  • स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी या आजाराच्या उपचारात वापरली जाणारी Zolgensma आणि Viltepso ही जीवरक्षक औषधे व्यक्तिगत वापरासाठी आयात केल्यास त्यांना वस्तू आणि सेवा करात संपूर्ण सूट देण्यात आली आहे.
  • कोविड-19 आजारावरील उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही औषधांना सध्या लागू असलेल्या वस्तू आणि सेवा करातील सवलतीला 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • 2021 केंद्रीय औषध विभागाने शिफारस केलेल्या 7 अन्य औषधांवरील वस्तू आणि सेवा कर 31 डिसेंबर 2021 पर्यंत 12% हून कमी करून 5% दराने आकारला जाणार.
  • कर्करोगाच्या उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या Keytruda या औषधावरील वस्तू आणि सेवा कराचे दर 12% वरून कमी करून 5% केले आहेत.

वस्तू आणि सेवा कर मंडळाने घेतलेले काही लोककेंद्रित निर्णय.

 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *