आठवड्यातील महत्वाच्या बातम्या –

चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी – पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी.

नवमतदारांच्या जनजागृतीसाठी राज्यभर स्वीप कार्यक्रम राबविणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे.

भारत निवडणूक आयोगामार्फत नवमतदारांपर्यंत निवडणूक संदर्भात माहिती पोहोचविण्यासाठी राज्यात ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग’ (स्वीप) हा जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वसमावेशक सहभाग हे लोकशाहीचे मूलतत्त्व असल्याने शासकीय- निमशासकीय विभाग, अशासकीय संस्था, स्वायत्त संस्था, युवा-स्त्रिया, दिव्यांग, तृतीय पंथी, ग्रामीण-शहरी नागरिक, आदिवासी, स्थलांतरीत अशा विविध घटकांच्या सक्रिय सहभागाने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी एकत्रितरित्या कार्य करणे आवश्यक आहे. सर्व विभागांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

नवमतदारांच्या जनजागृतीसाठी राज्यभर स्वीप कार्यक्रम राबविणार.

निर्यातदारांसाठी 24 तास कार्यरत राहणारी हेल्पलाईन केंद्र सरकार सुरु करणार.

निर्यातदारांच्या सहाय्यासाठी आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी 24 तास कार्यरत राहणारी हेल्पलाईन केंद्र सरकार संस्थात्मक करणार असल्याचे केंद्रीय  वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रव्यापी वाणिज्य सप्ताहाचा सेझ नोएडा इथे प्रारंभ करताना ते बीजभाषण देत होते. ‘ब्रान्ड इंडिया’म्हणजे दर्जा, उत्पादकता, कौशल्य आणि नवोन्मेश यांचा प्रतिनिधी राहावा हा आपला उद्देश असल्याचे ते म्हणाले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून प्रगतीशील भारताची 75 वर्षे साजरी करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय देशभरात 7 दिवसांचा विशेष कार्यक्रम सुरु करत आहे. वाणिज्य सप्ताहात देशाची कीर्ती तसेच जन चळवळ आणि जन भागीदारीची भावना प्रतीत होणार असल्याचे ते म्हणाले.

निर्यातदारांसाठी 24 तास कार्यरत राहणारी हेल्पलाईन केंद्र सरकार सुरु करणार.

 

ई संजीवनी या केंद्र सरकारच्या टेलीमेडिसिन उपक्रमाने गाठला 1.2 कोटी सल्ल्यांचा टप्पा.

दररोज सुमारे 90,000 रुग्ण ई संजीवनी या दूरस्थ आरोग्य सुविधेचा लाभ घेतात.

ई संजीवनी या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने 1.2 कोटी (120लाख ) सल्ल्यांचा टप्पा गाठत देशाची सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठी टेलीमेडिसिन सेवा म्हणून आकार घेतला आहे. सध्या राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवा देशभरात  दररोज 90,000 रुग्णांना सेवा पुरवत आहे. रुग्ण त्याच बरोबर डॉक्टर आणि तज्ञानी व्यापक रूपाने याचा स्वीकार केल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

ई संजीवनी या टेलीमेडिसिन उपक्रमाने गाठला 1.2 कोटी सल्ल्यांचा टप्पा.

 

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद. शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत.

राज्यातील ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करणे, त्यांना ‘शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू करणे या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला कार्यान्वित करण्यासाठी श्री. मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद. शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत.

 

कोविड पश्चात उद्‌भवणाऱ्या गंभीर आजारांबाबत मार्गदर्शक तत्वे.

कोविड पश्चात उद्‌भवणाऱ्या गंभीर आजारांबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडवीय यांनी आज प्रकाशन केले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यावेळी उपस्थित होत्या.कोविडच्या दीर्घकालीन परिणामांना सामोरे जाण्यासाठी भारतभरातील डॉक्टर, परिचारिका, निम-वैद्यकीय कर्मचारी आणि सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी ही मार्गदर्शक तत्वे उपयुक्त ठरतील.

कोविड पश्चात उद्‌भवणाऱ्या गंभीर आजारांबाबत मार्गदर्शक तत्वे.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबाबत बैठक घेतली.

केंद्रीय शिक्षण मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याबाबत बैठक घेतली. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिव  अनिता करवाल,  बीआयएसएजी-एन चे महासंचालक डॉ. टी. पी. सिंह, डीजी, प्रसार भरतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी एस. वेंपती आणि शिक्षण मंत्रालयाचे अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबाबत बैठक घेतली.

23 ते 25 ऑक्टोबरला जी.डी.सी.ॲण्ड ए. व सी.एच.एम.परीक्षा

शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्ड) कडून जी.डी.सी.अँड ए. व सी.एच.एम. परीक्षा 2020ची परीक्षा दि.22,23 व 24 मे, 2020 रोजी घेण्यात येणार होती. कोरोना संसर्गामुळे सदरची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. ही परीक्षा 23,24 व 25 ऑक्टोंबर, 2021 रोजी घेण्यात येणार असल्याचे जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्ड चे सचिव तथा सहकारी संस्थेचे उपनिबंधक महेंद्र मगर यांनी कळविले आहे.

23 ते 25 ऑक्टोबरला जी.डी.सी.ॲण्ड ए. व सी.एच.एम.परीक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे – राज्य निवडणूक आयुक्त.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी आतापासूनच वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे.

संरक्षण मंत्रालयाचा स्पेनच्या एअरबस एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनीशी करार.

संरक्षण मंत्रालयाने, भारतीय हवाई दलासाठी, स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस (संरक्षण आणि अवकाश)  कंपनीशी 56 C-295MW या वाहतूक विमानांच्या खरेदीबाबत करार केला आहे. आज म्हणजेच, 24 सप्टेंबर 2021रोजी झालेल्या या करारानुसार, भारतीय हवाई दलाला ही विमाने मिळणार आहेत. यासोबतच, मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस सोबत एक ऑफसेट करारही करण्यात आला असून, त्यानुसार, या कंपनीला करारातील भारतीय भागीदार कंपन्यांकडून, पात्र उत्पादने आणि सेवा खरेदी करणे बंधनकारक असणार आहे.

संरक्षण मंत्रालयाचा स्पेनच्या एअरबस एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनीशी करार.

ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी.

पुढील आदेशापर्यंत क्षमतेच्या ९५ टक्क्यांपर्यंत एलएमओ साठवून ठेवावं.

कोविड- १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एल एम ओ) अर्थात तरल वैद्यकीय प्राणवायू कमी पडू नये यासाठी त्याची साठवणूक करून ठेवण्यासंबंधी राज्य शासनाने उत्पादकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

 

ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *