आठवड्यातील महत्वाच्या बातम्या.
पंतप्रधानांच्या हस्ते आयुष्मान भारत डिजिटल अभियानाचा शुभारंभ.
यावेळी बोलतांना, पंतप्रधान म्हणाले की, गेल्या सात वर्षांत, देशातल्या आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सरकारने जे अभियान सुरु आहे, ते अभियान आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. “आज आम्ही अशा एका अभियानाची सुरुवात करत आहोत, ज्यात भारतातील आरोग्य सुविधांमध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याची क्षमता आहे”, असं पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांच्या हस्ते आयुष्मान भारत डिजिटल अभियानाचा शुभारंभ.
जिल्हा कौशल्य विकास केंद्रातर्फे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.
जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे सोमवार 4 ऑक्टोबर 2021 रोजी 6 व्या पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यासाठी नामांकित उद्योजकांनी ऑनलाईन रिक्तपदे अधिसूचित केली आहेत.
जिल्हा कौशल्य विकास केंद्रातर्फे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.
अन्न व्यावसायिकांनी विक्री देयकावर नोंदणी क्रमांक छापणे बंधनकारक
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार १ ऑक्टोबरपासून सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या विक्री देयकावर १४ अंकी परवाना अथवा नोंदणी क्रमांक छापणे बंधनकारक आहे.
चौदा अंकी परवाना अथवा नोंदणी क्रमांक हा त्या अन्न व्यावसायिकाची विशिष्ठ ओळख दर्शवितो.
अन्न व्यावसायिकांनी विक्री देयकावर नोंदणी क्रमांक छापणे बंधनकारक.
मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र.
मुंबई –नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसेच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
‘जीएसटी’ प्रणालीतील त्रूटी दूर करुन ती सोपी, दोषविरहित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रिगट स्थापन.
वस्तू व सेवा करप्रणालीतील (जीएसटी) त्रूटी दूर करुन ती सहज, सोपी करण्यासंदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे. मंत्रीगटाने शिफारस केलेल्या आणि जीएसटी परीषदेने मंजूर केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीवर देखील हाच मंत्रिगट देखरेख ठेवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले.
‘जीएसटी’ प्रणालीतील त्रूटी दूर करुन ती सोपी, दोषविरहित करण्यासाठी केंद्रस्तरीय मंत्रिगट स्थापन.
ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील पहिली पॅन-इंडिया (बृहद भारत) हेल्पलाइन: एल्डर लाइन (टोल फ्री क्रमांक- 14567)
भारतात 2050 पर्यंत अंदाजे 20% वृद्ध लोकसंख्या म्हणजेच 300 दशलक्ष ज्येष्ठ नागरिक असतील. हे लक्षणीय आहे; कारण अनेक देशांची लोकसंख्या देखील या संख्येपेक्षा कमी आहे. या वयोगटाला विविध मानसिक, भावनिक, आर्थिक, कायदेशीर आणि शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशात महामारीने त्यात आणखी वाढ झाली आहे. हा वयोगट, देशाच्या एकूण आर्थिक आणि सामाजिक समृद्धतेसाठी ज्ञानाचा पण काहीसा दुर्लक्षित असा महत्वाचा स्त्रोत आहे हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील पहिली पॅन-इंडिया (बृहद भारत) हेल्पलाइन.
बॉईज स्पोर्टस कंपनी, पुणे येथील प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी पुणे येथील प्रवेशाकरिता 6 ऑक्टोबर 2021 सकाळी 8 वाजता वार्म अप ट्रॅक मैदान श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल म्हाळुंगे येथे क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
बॉईज स्पोर्टस कंपनी, पुणे येथील प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन.
लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय.
लोकसेवा हक्क अधिनियम-2015 बाबत जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक.
राज्य शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम हा क्रांतिकारी कायदा जनहितासाठी आणि लोकांना अधिकार देण्यासाठी केला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी विहीत वेळेत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले. सेवा हमी कायद्यानुसार निश्चित केलेल्या कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना ऑनलाइन सेवेत पुणे जिल्ह्याने केले कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारने 22000 हून अधिक अनुपालन नियम रद्द केले.
अनावश्यक कायदे रद्द करून इतर कायद्यांचे सुलभीकरण करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत – पीयूष गोयल
अनुपालनाचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्रालये आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे प्रयत्न सुरु असून अनावश्यक कायदे रद्द करून इतर कायद्यांचे सुलभीकरण करणे हा उद्देश असल्याचे वाणिज्य आणि उद्योग , ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले. ते आज नवी दिल्ली येथे अनुपालन भार कमी करण्याबाबत डीपीआयआयटी द्वारा आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होते.
शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय.
विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच ‘आशा’ असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नाविन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कारकुन संवर्गातील भरती हिंदी व इंग्लिश सोबत 13 प्रादेशिक भाषांमधूनही व्हावी अशी अर्थ मंत्रालयाची शिफारस
सध्या सुरु असलेली 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कारकुन संवर्गाची भरतीप्रक्रिया राबवताना पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा हिंदी व इंग्लिश सोबत 13 प्रादेशिक भाषांमधूनही व्हावी, तसेच यापुढील भरतीच्या वेळीदेखील हीच पद्धत वापरावी अशी शिफारस अर्थ मंत्रालयाने केली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी 13 प्रादेशिक भाषांमध्ये लिपिक भरती घेण्याच्या शिफारशी.