आयएसी विक्रांतच्या पुढील सागरी चाचण्यांना सुरुवात.

IAC Vikrant Sets Sail For The Nest Set Of Sea Trials.

भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आयएसी विक्रांतच्या पुढील सागरी चाचण्यांना सुरुवात.IAC Vikrant Sets Sail For The Nest Set Of Sea Trials.

दिल्ली : भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती – अशा उच्चपदस्थांच्या सलग दोन भेटीनंतर केवळ दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत आयएसी विक्रांतच्या पुढील समुद्री चाचण्या सुरु करण्यात येत आहेत.  दोन्ही मान्यवरांनी तिच्या प्रगतीचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले आणि प्रकल्पाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

नौकेची गती, दिशादर्शक प्रणाली आणि मूलभूत ऑपरेशन्स या कार्याचे परीक्षण करण्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पहिल्या सागरी चाचण्या यशस्वी झाल्या होत्या, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या  दुसऱ्या सागरी चाचणीमध्ये विविध यंत्रसामग्रीच्या चाचण्या आणि उड्डाण चाचण्यांच्या वेळीही जहाजाच्या गतीच्या चाचण्या करण्यात आल्या.

दुसर्‍या चढाईच्या वेळी जहाजाने 10 दिवस गोदीबाहेर राहून आपल्या कार्यक्षमतेने प्रदर्शन केले.  दुसऱ्या चाचणी दरम्यान नौवहन विषयक विविध सागरी कामगिरी देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या.  जहाजाच्या क्षमतेवर पुरेसा आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर, आयएसी विक्रांतची,  आता विविध आव्हानात्मक  परिस्थितींमध्ये जहाज कसे कार्य करते याची चाचपणी  केली जाणार आहे. आहे.  याशिवाय जहाजाच्या विविध सेन्सर सूट्सचेही परीक्षणही होणार आहे.

आयएसी विक्रांत अनेक चाचण्यांमध्ये यशस्वी ठरले आहे.  आत्मनिर्भरता  असो, ज्याअंतर्गत 76% उपकरणे स्वदेशात तयार केली जातात किंवा भारतीय नौदल आणि मेसर्स कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या डिझाईन टीम्समधील समन्वय– आतापर्यंतची देशी बनावटीची ही सर्वात मोठी आणि आणि किचकट युद्धनौका आहे.

भारतीय युद्धनौका बांधणीच्या इतिहासात हे जहाज त्याच्या पहिल्याच चाचणीपासूनच मूलभूत कौशल्याच्या बाबतीत सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.  देशातील कोविडचा वाढता संसर्ग  आणि परिणामी आलेली आव्हाने असतांनाही, प्रकल्पाशी संबंधित अनेक संस्थांचे एकत्रित समूह, कार्य वेळेवर पूर्ण करण्यासाठी उत्साही  आणि वचनबद्ध होते.

सागरी चाचण्यांची मालिका यशस्वीपणे पूर्ण केल्यावर, या वर्षाच्या शेवटी,  स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत, जहाज आयएनएस विक्रांत कार्यान्वित केले जाणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *