Ministry of AYUSH organizes sun salutation demonstrations for 75 lakh people around the world on Makar Sankranti.
आयुष मंत्रालयाकडून मकरसंक्रांतीला जगभरातल्या ७५ लाख लोकांसाठी सुर्यनमस्काराच्या प्रात्यक्षिकांचं आयोजन.
नवी दिल्ली: आयुष मंत्रालयनं जगातल्या ७५ लाख लोकांसाठी येत्या १४ तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं आहे.
नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी लोकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं. सूर्यनमस्कारामुळे रोग प्रतिकारशक्ती विकसित होते आणि चैतन्य वाढतं जे साथ रोगाच्या परिस्थितीत आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असं सोनोवाल म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या फायद्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि सूर्यनमस्कार हे जगभरातील्या लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणखी एक पाऊल आहे, असं ते पुढे म्हणाले.
सामुहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांतून हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जाईल.