ICC Men’s U-19 World Cup: India beat South Africa by 45 runs in the opening Group B match.
आय सी सी पुरुष अंडर-19 विश्वचषक: भारताने ब गटातील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव केला.
गयाना : भारताच्या अंडर-19 संघाने गयाना येथे त्यांच्या आय सी सी पुरुष अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या वनडेत ब गटात दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना कर्णधार यश धुलच्या ८२ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ४६.५ षटकांत सर्व गडी गमावून २३२ धावा केल्या.
कौशल तांबेने 35 तर शेख रशीदने 31 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू बोस्टने तीन बळी घेतले, तर ऍफिवे मन्यांदा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.4 षटकांत 187 धावांत भारताच्या भेदक गोलंदाजीमुळे गुंडाळला.
डेवाल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक 65 धावा केल्या. भारताकडून विकी ओस्तवालने पाच तर राज बावाने चार विकेट घेतल्या.
भारताला ब गटात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडा सोबत ठेवण्यात आले आहे. U19 विश्वचषक 2022 जिंकण्यासाठी भारताचा U19 संघ फेव्हरिटपैकी एक आहे. भारताने विक्रमी चार वेळा
विजेतेपद जिंकले आहे आणि गेल्या वेळी उपविजेतेपद पटकावले होते.