आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी तात्पुरती फिरती रुग्णालयं तयार करा – केंद्र सरकार.
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आवाहन केले आहे की, कोविड-I9 मुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण कमीतकमी कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न केले पाहिजेत.
दिल्ली: कोविड १९ च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य पायाभूत सुविधांची उपलब्धता वाढवण्यासाठी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी तात्पुरती फिरती रूग्णालयं तयार करावीत अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्राद्वारे तशा सूचना दिल्या आहेत. डीआरडीओ, सीएसआयआर तसंच खाजगी क्षेत्रं, स्वयंसेवी संस्था आणि इतरांच्या समन्वयातून या रूग्णालयांची व्यवस्था करता येऊ शकेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
कोविड उपचारांसाठी वाहिलेल्या सरकारी आणि खाजगी रूग्णालयांशी संलग्न हॉटेलच्या खोल्या किंवा इतर निवासी जागेचा वापर रूग्णांना ठेवण्यासाठी करावा, असा सल्लाही केंद्रानं दिला आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावरचे नियंत्रण कक्ष कार्यान्वित होतील, याची दक्षता राज्यांनी घ्यावी. रूग्णवाहिका, रूग्णालयातल्या उपलब्ध खाटा याविषयी दक्षता बाळगून त्याविषयी जनतेला त्याची योग्य माहिती द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी केंद्रसरकार आवश्यक ते सर्व पाठबळ देईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) उपक्रमांतर्गत यापूर्वी कोविड-l9 प्रकरणांच्या क्लिनिकल व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर राज्यस्तरीय उत्कृष्ट केंद्रांसोबत वेबिनारची मालिका आयोजित केली होती.
वेबिनारच्या या मालिकेला डॉक्टर, विशेषत: इन्सेंटीव्ह केअर तज्ञ आणि क्रिटिकल केअर तज्ञांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश उत्कृष्टता केंद्रांना त्यांच्या जिल्हा-स्तरीय समकक्षांसह वेबिनारची समान मालिका आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले होते, जे अनेक राज्यांनी हाती घेतले होते.
श्री भूषण यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, त्या प्रयत्नांच्या पुढे, दिल्लीतील एम्सच्या सहकार्याने सर्व राज्यस्तरीय उत्कृष्ट केंद्रे आणि जिल्हास्तरीय सार्वजनिक आणि खाजगी कोविड आरोग्य सुविधांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स वेबिनारची आणखी एक मालिका असेल.
कोविड-19 चा सामना करण्यासाठी या महिन्याच्या 5 ते 19 जानेवारीपर्यंत नऊ वेबिनार वेगवेगळ्या विषयांवर नियोजित करण्यात आले आहेत.