Approval to start a postgraduate course at Armed Forces Medical College.
आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजला (AFMC) पदव्युत्तर पदवी (Postgraduate Course)अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता.
मुंबई : पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजला(AFMC) एम.डी ( MD Geriatrics) हा नवीन वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम ( New Medical Postgraduate Course) ( सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 2 विद्यार्थी प्रवेशक्षमतेने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या महाविद्यालयातील नमूद वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची(Medical Postgraduate Degree Course) विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार दोन इतकीच राहील.
सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या(Medical Postgraduate Degree Course) प्रवेशाकरिता ( MD Geriatrics)निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे.
राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या (Medical Postgraduate Course) वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांची संलग्निता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश करण्यात येतील.