Indian team wins 8 gold medals at Asian Wrestling Championships
आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत पटकावलं अजिंक्यपद
किर्गिस्तान : किर्गिस्तानच्या बिश्केक इथं झालेल्या १७ वर्षाखालील आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत अजिंक्यपद पटकावलं.
२३५ गुणांसह भारत अव्वल स्थानावर राहिला. या स्पर्धेत भारतानं ८ सुवर्ण एक रौप्य आणि एक कास्य पदक मिळवलं.
जपान १४३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला, तर मंगोलिया १३८ गुणांसह तीसऱ्या स्थानावर राहिला.
महिला कुस्तीच्या ५ वजनी गटात लढती झाल्या. रितिकासह भारतीय महिलांनी ४३ किलोग्रॅममध्ये सुवर्ण, अहिल्या शिंदेने ४९ किलोग्रॅममध्ये सुवर्ण, शिक्षाने ५७ किलोग्रॅममध्ये सुवर्णपदक, प्रियाने ७३ किलोग्रॅममध्ये सुवर्ण तर पुलकितने ६५ किलोग्रॅममध्ये रौप्यपदक मिळवले.
याशिवाय फ्री स्टाइलच्या तीन वजनी गटातही स्पर्धा घेण्यात आल्या आणि परविंदर सिंगने 80 किलोग्रॅममध्ये सुवर्ण तर नरेंद्रने 71 किलोग्रॅममध्ये रौप्यपदक पटकावले. फ्री स्टाइलच्या उर्वरित सात वजनी गटातील स्पर्धा आज होणार आहे.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com