India wins bronze in Asia Cup women’s hockey.
आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत भारताला कांस्य पदक.
ओमान इथं सुरु असलेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं.
कांस्य पदकासाठी आज झालेल्या लढतीत भारतानं चीनचा २-० असा पराभव केला. भारताच्या वतीनं शर्मीला देवी हीनं १३ व्या मिनिटाला तर गुरजीत कौर हिनं १९ मिनीटाला गोल केला.
भारताच्या भक्कम बचावामुळे चीनला मात्र भारताविरोधात एकही गोल करता आला नाही.
स्पर्धेच्या विजेतेपदासाठी दक्षिण कोरीया आणि जपान यांच्यात लढत सुरु आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, या सामन्याच्या दुसऱ्या सत्रापर्यंतच्या खेळात कोरीयानं जपानवर १-० अशी आघाडी घेतली होती.