इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुंची महागाई या साठी केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम.
हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुंची महागाई करणार्या केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
बुधवार दि.14 जुलै 2021 रोजी दु.2 वाजता शर्मा पेट्रोल पंप माऊंट कारमेल शाळे समोर कोंढवा-बिबवेवाडी रोड ,कोंढवा खुर्द पुणे येथे केंद्र सरकार विरोधात काँग्रेस कमिटीच्या स्वाक्षरी मोहीम वतीने घेण्यात आली.
गुरुवार दि.15 जुलै 2021पेट्रोल गॅस डिझेल व जीवनावश्यक वस्तुंचे भाव वाढल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मुंढवा येथील इंडेन पेट्रोल पंपांवर नागरिकांची सह्यंची मोहीम राबविण्यात आली.
याप्रसंगी पुणे शहर ओबीसी सेल चे अध्यक्ष साहिल केदारी, हडपसर विधानसभा मतदारसंघ कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश दादा राऊत, कॅन्टोमेंट ब्लॉक अध्यक्ष प्रदीप परदेशी, पुणे शहर काॅंग्रेसचे सरचिटणीस रॉबर्ट डेव्हिड, विशाल कवडे, राजु नायडू ,रवि भाग सिंग, हिरालाल जाधव, मनिष पाशामल्लु, इलाइबागवान, संजय कवडे ,नारायण जाधव ,निल्लाप्पा चलवादी, शिवाजी धनगर,नितिन कंरडे किशोर गायकवाड, क्लेमेंट लाजरस आदि कार्यकर्ते उपस्थित होते.