जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाकडून आयटीसी परतावा फसवणुकीचे मोठे प्रकरण उघडकीस
या आर्थिक फसवणूकीची पद्धती अशी होती की बनावट कागदपत्रांच्या आधारे झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अनेक डमी युनिट्स तयार करण्यात आली. त्यांनी छत्तीसगडमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या अनेक शेल कंपन्यांना बनावट आयटीसी दिला. तसेच महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथे निर्यात करण्यासाठी अनेक युनिट्स तयार करण्यात आली, ज्यांना छत्तीसगड मधील कारखान्यांनी निर्यात करण्यासाठी कथित बनावट माल पाठवला. निर्यात युनिट्स केवळ फसव्या पद्धतीने परतावा मिळवण्याच्या हेतूने तयार केली होती.
आर्थिक फसवणुकीच्या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पकडण्यासाठी, जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालय, मुंबईने संबंधित सीएचए, सीए, सीएस, प्रमुख व्यक्ती आणि मालवाहतूक फॉरवर्डर्स यांचा शोध घेतला आणि अनेक जबाब नोंदवले. तपासात हे उघड झाले की, महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवासी संतोष दोशी, जो मेसर्स मासुमी ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेडचा व्यवस्थापकीय संचालक आहे, तो प्रत्यक्षात या 7 निर्यातदार कंपन्यांचा प्रवर्तक आणि ऑपरेटर होता. त्याने आयटीसी रोख स्वरूपात मिळवण्यासाठी उत्पादकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत आणि निर्यातदारांपर्यंत विविध व्यवहारांचा वापर करून एक जाळे तयार केले.
संतोष दोशीला 17.08.2021 रोजी अटक करण्यात आली आणि त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याला 2016 मध्येही मुंबई सीमाशुल्क विभागाने अटक केली होती.
याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.