इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ घेणाऱ्या एका कंपनीच्या अधिकृत व्यक्तीला अटक.

Goods & Service Tax हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

नवी मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयाने बनावट पावत्यांच्या आधारावर इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ घेणाऱ्या एका कंपनीच्या अधिकृत व्यक्तीला अटक.

या कंपनीने 5 कोटी रुपयांच्या इनपुट क्रेडीटचा लाभ घेतला, आरोपींना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी.Goods & Service Tax

मुंबई : नवी मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयाने मेसर्स जी एस स्टील या कंपनीच्या एका अधिकृत व्यक्तीला कोणत्याही प्रकारे मालाचा पुरवठा न करता बनावट पावत्यांच्या आधारे 5.13 कोटी रुपये मूल्याच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ घेतल्याबद्दल आणि त्याचा वापर केल्याबद्दल अटक केली आहे. या आरोपीला अटक केल्यावर आज 30 डिसेंबर 2021 रोजी बेलापूरच्या प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

नवी मुंबईच्या सीजीएसटीच्या करचुकवेगिरी प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी धातूच्या भंगाराच्या व्यवसायात असलेल्या या कंपनीची चौकशी केल्यावर या कंपनीचे मेसर्स मार्कंडेय ट्रेडर्स, मेसर्स रिगल ऍल्युमिनियम, मेसर्स एम एस स्टील्स, मेसर्स तमन्ना ट्रेडींग कंपनी, मेसर्स युनायटेड ट्रेडर्स, मेसर्स सनराईझ ट्रेडर्स, मेसर्स डिव्हाईन एन्टरप्राईझ आणि इतर सर्व पुरवठादार  अस्तित्वात नसल्याचे आणि त्यांच्या नावावर बोगस इनपुट क्रेडीटचा लाभ घेतल्याचे आढळले.

सीजीएसटी कायदा 2017 च्या 132 कलमान्वये माल किंवा सेवेचा पुरवठा न करता इन्वॉईस किंवा बिल तयार करणे आणि चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडीटचा लाभ घेणे किंवा वापर करणे हा जर हे व्यवहार पाच कोटी रुपयांच्या वर असतील तर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. आरोपीला सीजीएसटी कायदा 2017 च्या 132(1) (क) या कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल या कायद्याचे कलम 69 (1) अन्वये अटक करण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *