Government’s attempt to conduct 10th and 12th class examinations on the scheduled date.
इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न.
मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
त्या काल मुंबईत बोलत होत्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत.
विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असं त्या म्हणाल्या. कोविड संसर्ग स्थितीचा १५ फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन, परिक्षा मंडळ, एसईआरटी आणि मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.