Uttar Pradesh Assembly elections begin today.
उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आज सुरू.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आज सुरू झाली. तिथं पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी झाली असून तिथं १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत सात टप्प्यात मतदान होणार आहे.
पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारीला मतदान होईल. २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला मणिपूरला निवडणूक होणार आहे.
मतमोजणी मात्र १० मार्चला एकाच दिवशी आहे. या पाच राज्यांमधे मिळून विधानसभेच्या ६९० जागांसाठी निवडणुका होत असून एकूण १८ कोटी ३४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यापैकी ८ कोटी ५५ लाख महिला मतदार आहेत. उमेदवारांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी सुविधा पोर्टलद्वारे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
अर्ज आणि प्रतीज्ञापत्र ऑनलाइन पोर्टलवर भरायचं आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी सी व्हिजिल या माहिती तंत्रज्ञान अॅपचा वापर निवडणूक आयोग करणार आहे. अधिकाधिक लोकांनी मतदान करावं आणि निवडणुकीत पारदर्शकता असावी यासाठी आयोग प्रयत्नशील आहे.