उद्यापासून महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू .
महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे.अधिवेशनासाठी विधिमंडळ इमारतीत प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. आमदार, अधिकारी व कर्मचार्यांच्या कोरोना चाचणीसाठी सर्व आवश्यक व्यवस्था विधिमंडळाच्या आवारात करण्यात आली आहेत.
शनिवारी दिवसभरात एकूण 2,200 लोकांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी चार जणांची चाचणी सकारात्मक झाली, त्यात एक लिपिक, अग्निशामक आणि दोन शिपायांचा समावेश आहे.
तर, रविवारी घेतल्या गेलेल्या कोरोना चाचण्यांचे अहवाल सोमवार सकाळपर्यंत उपलब्ध होतील.आमदारांना आपापल्या जिल्ह्यात कोरोना टेस्ट करायची असल्यास आवश्यक त्या सुविधा देण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिका .्यांना यापूर्वीच देण्यात आले आहेत.