Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated the park at Wakad
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाकड येथील उद्यानाचे उद्घाटन
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाकड येथील तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. श्री.पवार यांनी उद्यानाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी आयुक्त राजेश पाटील, उपायुक्त विकास ढाकणे आणि जितेंद्र वाघ, माजी गृहराज्यमंत्री सचिन आहिर, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.
हे संगीत संकल्पनेवरील आधारित महाराष्ट्रातले पहिले उद्यान आहे. यामध्ये रंभा-सांभा, चांम्स्, स्टूल, ड्रम, टंग व डमरु असे संगीत वाद्य आहेत. ४८० चौरस मीटर आकाराचे पियानो सभागृह, लहान मुलांसाठी क्रीडांगण आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उद्यानाच्या जागेचे क्षेत्रफळ १० हजार चौरस मीटर आहे. ३ हजार ८५० चौरस मीटर क्षेत्रात लॉन असून परिसरात झाडे लावण्यात आली आहेत. जॉगिंग पथ आणि योगा सभागृहाची सुविधादेखील करण्यात आली आहे.
व्हेरॉक वेंगसरकर अकादमीतील पव्हेलिअनचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील थेरगाव गावठाण येथील व्हेरॉक वेंगसरकर अकादमीतील पव्हेलीअनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री.पवार यांनी पव्हेलीअनची पाहणी करून माहिती घेतली.
हडपसर न्युज ब्युरो