उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत महेंद्रगिरी युद्धनौकेचं जलावतरण

Launching of Mahendragiri warship in the presence of Vice President Jagdeep Dhankhad उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत महेंद्रगिरी युद्धनौकेचं जलावतरण हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Launching of Mahendragiri warship in the presence of Vice President Jagdeep Dhankhad

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत महेंद्रगिरी युद्धनौकेचं जलावतरण

अलीकडच्या काळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि जागतिक पातळीवरील उंचावलेले स्थान यामुळे भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आधुनिक नौदलाची गरज आहे

आज जलावतरण झालेली ‘महेंद्रगिरी’ ही प्रोजेक्ट 17ए या प्रकल्पातील 7 वी स्टेल्थ विनाशिकाLaunching of Mahendragiri warship in the presence of Vice President Jagdeep Dhankhad
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत महेंद्रगिरी युद्धनौकेचं जलावतरण
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज ‘महेंद्रगिरी’ या माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या युद्धनौकेचे मुंबईत जलावतरण करण्यात आले . महेंद्रगिरी युद्धनौकेचं जलावतरण हा आपल्या सागरी इतिहासातील उज्ज्वल कामगिरीचा महत्वाचा टप्पा आहे, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे.

महेंद्रगिरी ही युद्धनौका म्हणजे अभियांत्रिकी विद्येचा चमत्कार असून यामध्ये असलेल्या एकमेवाद्वितीय वैशिष्ट्यांमुळे ती स्पर्धात्मक जगात तुल्यबळ ठरेल असं उपराष्ट्रपती म्हणाले. या युद्धनौकेच्या बांधणी दरम्यान ७५ टक्के निर्मिती ही देशांतर्गत कंपन्यांनी केली आहे, यामध्ये देशातल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचं योगदान महत्वाचं असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेला प्रत्यक्षात साकारण्यासाठीचे हे उल्लेखनीय प्रयत्न आहेत, असं त्यांनी सांगीतलं.

महेंद्रगिरी, हे नाव ओरिसा राज्याच्या पूर्व घाट परिसरातील पर्वत शिखराच्या नावावरून देण्यात आले आहे, प्रकल्प 17A फ्रिगेट्स श्रेणीतील ही सातवी युद्धनौका आहे. ही युद्धनौका प्रोजेक्ट 17 क्लास फ्रिगेट्स (शिवालिक क्लास) ची फॉलो-ऑन, अर्थात सुधारित आवृत्ती असून, यामध्ये सुधारित स्टेल्थ अर्थात विनाशिकेची वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि संवेदन प्रणाली आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहेत. महेंद्रगिरी युद्धनौका ही तांत्रिक दृष्ट्या प्रगत युद्धनौका आहे आणि ती, भविष्यातील स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दिशेने पुढे जाताना, स्वतःच्या समृद्ध नौदल वारशाचा अभिमान बाळगण्याच्या भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे.

ही युद्धनौका एकात्मिक बांधकाम पद्धतीचा वापर करून बनवण्यात आली असून, यामध्ये समांतर आउटफिटिंगसह हल ब्लॉक्सचा समावेश आहे. या जहाजाचे बांधकाम वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये केले गेले आहे, आणि त्यानंतर माझगाव डॉक्स लि येथे स्लिपवेवर त्याचे एकत्रीकरण आणि उभारणी करण्यात आली आहे. महेंद्रगिरीच्या बांधणीची पायाभरणी 28 जून 2022 रोजी करण्यात आली होती, आणि ही युद्धनौका फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रत्यक्ष कामगिरीसाठी प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. अंदाजे 3450 टन वजनाचे हे जहाज भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होईल. असेल.

प्रकल्प 17A कार्यक्रमांतर्गत, मेसर्स माझगाव डॉक्स लि ची एकूण चार जहाजे आणि मेसर्स जीआरएसई ची तीन जहाजे बांधकामाधीन आहेत. प्रकल्प-17A जहाजांची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरो, अर्थात युद्धनौका रचना संस्थेने केली आहे. ही संस्था सर्व युद्धनौकांचे डिझाइन बनवणारी अग्रणी संस्था आहे. माझगाव डॉक्स लि आणि जीआरएसईद्वारे 2019-2023 दरम्यान या प्रकल्पातील पहिली सहा जहाजे पुरवण्यात आली आहेत. प्रकल्प-17A हा भारतात उत्पादने घेण्याच्यादृष्टीने विकास करून आणि आर्थिक परिप्रेक्षामधील कामगार/उद्योजक/एमएसएमईंना पाठबळ देऊन देशाच्या समृद्धीमध्ये योगदान देत आहे . अंदाजे 210 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची (एमएसएमई) या प्रकल्पामध्ये गुंतावूक असून, अंदाजे 1000 उपकंत्राटी कर्मचारी या प्रकल्पासाठी माझगाव डॉक्स लि.च्या परिसरामध्ये कार्यरत करण्यात आले आहेत.

सुमारे 13 सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था (PSUs) जटिल उपकरणे आणि प्रणालींचा पुरवठा करून, या प्रकल्पात योगदान देत आहेत. सरकारच्या “आत्म निर्भर भारत” च्या दृष्टीकोनाला अनुसरून, प्रकल्प-17A अंतर्गत 75% पेक्षा जास्त मागण्या, एमएसएमई सह, स्वदेशी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. महेंद्रगिरीचे आजचे जलावतरण , हा आपल्या देशाने स्वावलंबी नौदलाच्या उभारणीमध्ये केलेल्या अतुलनीय प्रगतीचा योग्य दाखला ठरेल.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
रुग्ण सेवा, मनुष्यबळ नियंत्रणासाठी ‘वॉर रुम’ तयार करावी
Spread the love

One Comment on “उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत महेंद्रगिरी युद्धनौकेचं जलावतरण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *