एकत्र कुटुंब पद्धती आणि मोठ्यांविषयीचा आदरभाव आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या केंद्रस्थानी आहे.

Joint family system & respect accorded to elders are core aspects of our civilisational values: Vice President.

एकत्र कुटुंब पद्धती आणि मोठ्यांविषयीचा आदरभाव आपल्या सांस्कृतिक  मूल्यांच्या केंद्रस्थानी आहे – उपराष्ट्रपती.

M Venkaiah Naidu Hon'ble Vice President
M Venkaiah Naidu Hon’ble Vice President

नेल्लोर: उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज भारतीय संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेली एकत्र कुटुंब पद्धती तसेच मोठ्या वयाच्या व्यक्तींविषयीचा आदरभाव या परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

कुटुंबातील तरुण सदस्यांना मार्गदर्शन करण्यात तसेच योग्य सल्ला देण्यात वयस्कर मंडळी निभावत असलेली महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत ते म्हणाले की, पिढ्यापिढ्यांमधील नात्यांचे बंध मूल्यव्यवस्थेचे संरक्षण करण्यात आणि तिला प्रोत्साहन देण्यास मदत करतात

उपराष्ट्रपती नायडू यांनी संक्रांतीच्या सणानिमित्त नेल्लोरच्या स्वर्ण भारत विश्वस्त संस्थेच्या वृद्धाश्रमातील रहिवासींशी आभासी पद्धतीने संवाद साधला. त्यांनी या आश्रमातील रहिवासींची विचारपूस केली तसेच त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत चौकशी केली. विश्वस्त संस्थेने सुरु केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी संस्थेचे कर्मचारी तसेच अधिकारी यांचे कौतुक केले.

भारतीय संस्कृतीमध्ये सणांचे महत्त्व विशद करतांना, नायडू यांनी,  निसर्गाचा आविष्कार साजरा करण्यात, कुटुंबांना एकत्र आणण्यात आणि समाजात शांतता आणि एकोपा नांदण्यात संक्रांतीसारख्या सणांचे महत्त्व आजच्या तरुणांनी समजून घेतले पाहिजे हा मुद्दा अधोरेखित केला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *