एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमधील 100% भागीदारीच्या अधिग्रहणाला भारतीय स्पर्धा आयोगाची मान्यता

HDFC Life Insurance

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमधील 100%  भागीदारीच्या अधिग्रहणाला भारतीय स्पर्धा आयोगाची मान्यता.

भारतीय स्पर्धा आयोगाने  (सीसीआय) स्पर्धा कायदा, 2002 च्या कलम 31(1) अंतर्गत एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून (प्राप्तकर्ता) होणाऱ्या एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मधील 100% भागीदारीच्या संपादनाला मान्यता दिली आहे.

HDFC Life Insurance
Image Source:
commons.wikimedia.org

प्रस्तावित एकत्रीकरणामध्ये एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेडकडून भागीदारी अधिग्रहित करणार्‍या प्राप्तकर्त्याद्बारे 100% उद्दिष्टाचे प्रतिनिधित्व करणारे संपूर्ण भरणा झालेल्या भागभांडवलाचे अधिग्रहण समाविष्ट आहे. भांडवल समभागांचे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर, एक्साइड लाइफ कंपनी (जी एचडीएफसी लाइफच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असेल) एचडीएफसी लाईफमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आहे.

प्राप्तकर्ती  जीवन विमा कंपनी ही  भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) मध्ये नोंदणीकृत आहे. ही कंपनी सहभागी, गैर-सहभागी आणि युनिट लिंक्ड विमा उत्पादनांसह वैयक्तिक आणि समूह जीवन विमा प्रदान करते. या कंपनीच्या  उत्पादन योजनांमध्ये  संरक्षण,निवृत्तीवेतन, बचत, गुंतवणूक आणि वार्षिकी अशा  विविध जीवन विमा आणि गुंतवणूक .उत्पादनांचा समावेश आहे. एचडीएफसी लाइफच्या पूर्ण मालकीच्या एचडीएफसी  पेन्शन मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड तसेच एचडीएफसी इंटरनॅशनल लाइफ आणि री कंपनी लिमिटेड या दोन उपकंपन्या आहेत.

एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणमध्ये नोंदणीकृत असलेली जीवन विमा कंपनी आहे. ही कंपनी संरक्षण योजना (मुदत विमा, बाल विमा योजना), बचत आणि गुंतवणूक योजना (युलिप्ससह), सेवानिवृत्ती आणि निवृत्तीवेतन योजनांसह विविध वैयक्तिक आणि समूह जीवन विमा उत्पादने प्रदान करते. या कंपनीची कोणतीही उपकंपनी नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *