एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावर आजही उच्च न्यायालयात तोडगा नाही.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावर आजही उच्च न्यायालयात तोडगा निघाला नाही. मुंबई उच्च न्यायालयानं येत्या बुधवारपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.
आज झालेल्या सुनावणीत राज्य सरकारनं, पगारवाढ दिल्याच नमूद केल मात्र त्यावर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणवंत सदावर्ते यांनी ही पगारवाढ अन्यायकारक असल्याचं सांगितलं. तसच पगारवाढ ही प्रमुख मागणी नसून विलीनीकरणाची मागणी मुख्य मुद्दा असल्याचं स्पष्ट केलं.
कर्मचाऱ्यांना जाणून बुजून त्रास दिला जात असून त्यांच्या बदल्या करण्यात आल्या असंही त्यांनी नमूद केलं.