ऑरिक सिटीमध्ये अधिक गुंतवणुकीसाठी प्रयत्न

Auric City project-Shendra, Aurangabad

ऑरिक सिटीमध्ये अधिक गुंतवणुकीसाठी प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ऑरिक सिटी प्रकल्पाची पाहणी केली. ऑरिक सिटी प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्यासाठी राज्य शासन निश्चितपणे प्रयत्न करेल, असे येथे त्यांनी सांगितले.Auric City project-Shendra, Aurangabad

शेंद्रा येथील ऑरिक सिटीच्या सभागृहात दिल्ली-मुंबई कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या या औद्योगिक सिटीचा मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रकल्पाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन जास्तीत जास्त उद्योग येण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली. कोविडसारख्या प्रतिकूल परिस्थितीतही औद्योगिक विकासाला चालना देण्यात आली असून ऑरिक सिटीमध्ये उद्योगासाठी नियोजनबद्ध पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे उद्योजक या ठिकाणी गुंतणुकीसाठी उत्सुक आहेत. राज्य शासनाकडूनही येथे औद्योगिक गुंतवणुक होण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डॉ.अनबलगन यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.

बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ऑरिक सिटीच्या संपूर्ण इमारतीची पाहणी केली. प्रकल्पाचा आराखडा आणि नियंत्रण कक्षाला भेट देवून त्यांनी माहिती घेतली. ऑरिक हे दहा हजार एकरवर वसलेले सर्व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेले औद्योगिक शहर आहे. केंद्र व राज्य सरकारचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या ऑरिक सिटी क्षेत्रात विविध उद्योगांसाठी सुनियोजित पायाभूत सुविधा आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *