ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची रेल्वे मंत्रालयाची मागणी

Railway Minister Ashwini Vaishnav रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Railway Ministry demands CBI inquiry into Odisha train accident

ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची रेल्वे मंत्रालयाची मागणी

विरोधकांनी ओडिशा रेल्वे अपघाताचं राजकारण न करता सहकार्य करावेRailway Minister Ashwini Vaishnav
 रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव 
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

बालासोर : ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत करावी अशी मागणी रेल्वे मंत्रालयानं केली आहे. या अपघाताचं मूळ कारण आणि त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, याबाबतचा तपास सीबीआयनं करावा अशी मागणी रेल्वे मंडळानं केल्याचं रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी काल बालासोर इथं माध्यमांशी बोलताना सांगितलं.

अपघातस्थळी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून या मार्गावरची रेल्वे सेवा येत्या बुधवारपर्यंत पूर्वपदावर येईल असं वैष्णव म्हणाले. या अपघातातील मृतांची संख्या 275 असल्याचं ओडीशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी म्हटलं आहे. दरम्यान आश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल कटक इथल्या रुग्णालयात जाऊन अपघातातील जखमींची विचारपूस केली.

ओडिशा राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये तर गंभीररीत्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज भुवनेश्वरला जाऊन अपघातग्रस्तांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय मदतीची पाहणी केली. भुवनेश्वरच्या एम्स रुग्णालयातनंतर ते कटकच्या SCB वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातही जाऊन आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवर बोलून परिस्थितीची आणि मदत कार्याची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.

विरोधकांनी ओडिशा रेल्वे अपघाताचं राजकारण न करता सहकार्य करावे–केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आवाहन

विरोधकांनी ओडिशा रेल्वे अपघाताचं राजकारण न करता, सहकार्य करावे असं आवाहन केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी उल्हासनगर इथे पत्रकार परिषदेत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांची माहितीही ठाकूर यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारने देशाच्या इतिहासातल्या उच्च संस्कृतीचे पुनरुज्जीवन केलं असून सरकारला देशाच्या उज्ज्वल परंपरेचा अभिमान आहे, असं ते म्हणाले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *