ओदिशा अपघातातल्या मृतांची संख्या आता २६१

The death toll in the Odisha accident now stands at 238 ओदिशा अपघातातल्या मृतांची संख्या आता २३८ हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The death toll in the Odisha accident now stands at 238

ओदिशा अपघातातल्या मृतांची संख्या आता २६१

ओदिशा दुर्घटनेबद्दल सर्वत्र शोकभावना

दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात आयोजित कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं पुढे ढकलले

बालासोर : ओदिशातल्या बालासोर इथल्या बहानगा रेल्वे स्थानकावर काल झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या वाढून २६१ झाली आहे तर ९०० गंभीर जखमी झाले आहेत, असं रेल्वेनं आपल्या ताज्या आकडेवारीत म्हटलं आहे. The death toll in the Odisha accident now stands at 238
ओदिशा अपघातातल्या मृतांची संख्या आता २३८
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

बचाव कार्य पूर्ण झाल्याची माहिती दक्षिण पूर्व रेल्वे विभागानं दिली आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, ओळख पटलेले मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत, अशी माहिती ओदिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली आहे.

काल संध्याकाळी सातच्या सुमाराला शालिमार-हावडा कोरोमंडल एक्सप्रेस बहानगा रेल्वेस्थानकावर एका मालगाडीला आदळल्यानंतर रुळांवरून घसरली. काहीच मिनिटांच्या अंतरानं आणि बंगळुरू-हावडा एक्सप्रेस रेल्वे गडी याच ठिकाणी घसरल्यामुळं हा अपघात झाल्याचं खरगपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितलं.

मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख रुपये तर किरकोळ जखमींना पन्नास हजार रुपये मदत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. वैष्णव यांनी आज परिस्थितीचा आढावा घेतला. या अपघाताची सविस्तरपणे उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. तसंच रेल्वे सुरक्षा आयुक्ततही स्वतंत्रपणे चौकशी करतील असं ते म्हणाले. गेल्या पंधरा वर्षातला हा सगळ्यात भीषण अपघात असून चौकशी नंतरच त्यामागचं निश्चित कारण समजेल, असं त्यांनी सांगितलं.

प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत प्रधानमंत्र्यां नी जाहीर केली आहे तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. केंद्र सरकारनं एम्सच्या डॉक्टरांची दोन पथकं घटनास्थळी रवाना केल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं. आवश्यक ती सर्व मदत सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज सकाळी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी बालासोर जिल्हा रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

दरम्यान अपघातग्रस्त कोरोमंडल एक्स्प्रेसमधे अडकलेल्या अडीचशे प्रवाशांनी घेऊन एक विशेष रेल्वेगाडी आज भद्रकहून चेन्नईकडे रवाना झाली. ही गाडी उद्या चेन्नईला पोहोचेल. काल झालेल्या अपघातामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ओदिशा दुर्घटनेबद्दल सर्वत्र शोकभावना

ओदिशातल्या अपघाताबद्दल जगभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. तैवानचे राष्ट्राध्यक्ष साइ इंग वेन, कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्तिन ट्रुडाॅ, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्स मायकेल, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वाँग आणि अमेरिकेचे भारतातले दूत एरिक गारसेटी यांनी शोक संदेश पाठवले आहेत. अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असं या सगळ्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात आयोजित कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे.  

ओदिशातील दुर्घटनेचं वृत्त क्लेशदायक असून या अपघातात बळी पडलेल्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. अपघाताचे वृत्त ऐकून अतीव दु:ख झालं, जखमींना त्वरित आराम पडावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन भविष्यात असे अपघात घडू नयेत याची काळजी रेल्वे मंत्रालयानं घ्यावी असं आवाहन विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारुन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही त्रुटी राहील्या तरच असे अपघात होतात, असं ते म्हणाले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *