औषधनिर्माण गुणवत्तेबाबत तडजोड करणाऱ्यांची गय करणार नाही

Union Health Minister Mansukh Mandaviya केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

We will not tolerate those who compromise on pharmaceutical quality

औषधनिर्माण गुणवत्तेबाबत तडजोड करणाऱ्यांची गय करणार नाही

भारतीय औषधनिर्माण आघाडीच्या आठव्या जागतिक औषधनिर्माण गुणवत्ता परिषदेला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले संबोधित

जगाचे औषध भांडार ही भारताची ओळख टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचे औषधनिर्मिती उद्योगाला आवाहन

औषधनिर्माण गुणवत्तेबाबत तडजोड करणाऱ्यांची गय करणार नाही, सरकारकडून कठोर पावले उचलली जात असल्याची मांडवीय यांची माहिती

औषधनिर्माण गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी उद्योगांनी एक स्वयं-नियामक प्रणाली उभारण्याचा विचार करावा- आरोग्यमंत्र्यांची सूचनUnion Health Minister Mansukh Mandaviya
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : कोविड आपत्तीनंतर जगाचे औषधी भांडार ही भारताने निर्माण केलेली ओळख टिकून राहावी यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच, रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी औषधनिर्मिती क्षेत्रातील उद्योगांना केले आहे. भारतीय औषधनिर्माण आघाडी (आयपीए) ने आयोजित केलेल्या जागतिक औषधनिर्माण गुणवत्ता शिखर परिषदेची आज सांगता झाली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी या समारोपाच्या सत्रात मार्गदर्शन केले.

कोविड आपत्तीच्या काळात सरकार आणि औषधनिर्मिती उद्योग या दोघांच्या सामाईक जबाबदारीने आपण या स्थानापर्यंत पोहोचू शकलो. उद्योगांनी आपली जबाबदारी ओळखून पूर्णपणे सरकारच्या मार्गदर्शनानुसार काम केले. आपत्तीच्या त्या काळात कोणीही आपल्या फायद्याचा किंवा आपल्या स्वार्थाचा विचार केला नाही असे सांगत त्यांनी उद्योगांच्या भूमिकेची प्रशंसा केली. उद्योगांच्या सहकार्यामुळेच भारताने 150हून जास्त देशांना कोविड वरील उपचारांसाठी औषधं आणि प्रतिबंधक लसीचा पुरवठा करण्याची कामगिरी करून दाखवली, असे ते म्हणाले. ही सर्वच औषधे दर्जेदार होती आणि कोणत्याही देशाकडून औषधांच्या दर्जाबाबत तक्रार आली नाही, असे त्यांनी नमूद केले.

दर्जेदार औषधांबरोबरच मोठ्या प्रमाणात औषधनिर्मिती करण्याची भारताची क्षमता आहे. त्यामुळे भारत क्वालिटी आणि क्वान्टीटी या दोन्ही बाबतीत पुढे आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र, आगामी काळात आपले हे स्थान टिकवण्यासाठी आपल्या औषधांच्या गुणवत्तेबाबत तडजोड करून चालणार नाही. ही गुणवत्ता टिकून राहिली पाहिजे आणि त्यासाठी उद्योगांनी एक स्वयं नियामक प्रणाली स्थापन करण्याचा विचार करावा अशी सूचना त्यांनी केली. गुणवत्तेबाबत तडजोड करणाऱ्यांबाबत सरकारचे शून्य सहनशीलता धोरण आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा कंपन्यांविरोधात सरकारने कठोर पावले उचलली आहेत, असे त्यांनी सांगितले. गुणवत्ता टिकवण्यासाठी उद्योगांच्या सहकार्याची आवश्यकता आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

दर्जेदार औषधनिर्मिती आणि निर्यातवाढीसाठी आपल्याला परस्परांसोबत विचारविनिमय केला पाहिजे, असे मांडवीय यांनी सांगितले. बदलत्या काळातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवनवीन औषधांची निर्मिती करण्यासाठी सरकारने संशोधनाच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत आणि सर्वांसाठी त्या खुल्या केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. संशोधन आणि नवोन्मेष या दोन्ही क्षेत्रात भारताची आगेकूच सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या शिखर परिषदेची संकल्पना, “रुग्ण केंद्री व्यवस्था: उत्पादन आणि दर्जातील नवा आमूलाग्र बदल” अशी होती. या दोन दिवसीय शिखर परिषदेत, या क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक, जागतिक नियामक, गुणवत्ता विषयातील तज्ञ आणि इतर हितसंबंधीय एकत्र आले होते. भारतातील औषधनिर्माण क्षेत्राला आकार देण्यासाठी महत्वाच्या विषयांवर या परिषदेत चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण झाली.

आयपीए चे अध्यक्ष आणि टोरेंट फार्मास्युटिकल्स कंपनीचे प्रमुख समीर मेहता यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारत सरकारच्या औषधनिर्माण विभागाच्या सचिव एस अपर्णा यांनी उद्घाटन सत्रात मुख्य भाषण केले. पहिल्या दिवशी औषधनिर्माण उद्योगात उत्पादन आणि गुणवत्ता निर्माण करण्याच्या संस्कृतीच्या भविष्यातील महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला. जगभरातील नियामक – ज्यात अमेरिकेतील एफडीए, एमएचआरए, ईडीक्यूएम आणि सीडीएससीओ यांनी अलीकडे करण्यात आलेल्या तपासणीची निरीक्षणे तसेच कल अधोरेखित करणार्‍या नियमनविषयक प्रकरणांवर चर्चा केली. औषधनिर्माण उत्पादनांचा दर्जा उत्तम राहील, हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, यावर सविस्तर चर्चा होऊन पहिल्या सत्राची सांगता झाली

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *