कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी न खेळता वर्क फ्रॉम होम सुरू ठेवलं पाहिजे.
कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी न खेळता वर्क फ्रॉम होम सुरू ठेवलं पाहिजे, एम्प्लॉइज सिनेटचे अध्यक्ष हरप्रीत सलूजा यांची मागणी
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रभावाने पुण्यातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचारी वर्ग धास्तावला आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी न खेळता किमान पुढचे सहा महिने ते एक वर्ष वर्क फ्रॉम होम सुरू ठेवलं पाहिजे, अशी मागणी एम्प्लॉइज सिनेटचे अध्यक्ष हरप्रीत सलूजा यांनी केली आहे.
पुण्यामध्ये जवळपास सहा लाख आयटी कर्मचारी आहे. त्यापैकी 40 टक्के कर्मचाऱ्यांनी आता प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन काम करायला सुरुवात केली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनाही आता ऑफिसमध्ये प्रत्यक्ष कामासाठी रुजू होण्याच्या सूचना येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर; कंपन्यांनी आणखी काही महिन्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू ठेवावं, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.