कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे दर गेल्या वर्षी पेक्षा कमी.

Potato-Onion-Tomato-Pxhere

कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे  दर गेल्या वर्षी पेक्षा कमी.

बफर साठा संचालनाद्वारे कांद्याचे दर स्थिर करण्यात  येत आहेत.

ग्राहक व्यवहार विभागाने ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून  कांद्याचे दर संयमित करणे आणि साठवणुकीतील कमीतकमी तोटा सुनिश्चित करणे या दुहेरी उद्देशाने साठ्यातील कांदा  प्रथम आवक – प्रथम जावक (फर्स्ट इन – फर्स्ट आऊट) तत्त्वावर लक्ष्यित रूपाने जारी करण्यात येत आहे.

Potato-Onion-Tomato-Pxhere
Image by PXHERE.COM

ज्या राज्य / केंद्रशासित प्रदेशातील किमती देशव्यापी सरासरी पेक्षा जास्त आणि मागील महिन्यापेक्षा अधिक वधारत असतील, अशा ठिकाणी कांदा जारी करण्यात येत आहे. 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत दिल्ली, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, मुंबई, चंदीगड, कोची आणि रायपूर या प्रमुख बाजारपेठांमध्ये एकूण 67,3567 एम टी कांदा  जारी  करण्यात आला.

बाजारात पुरवठा करण्याव्यतिरिक्त, ग्राहक व्यवहार विभागाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना साठवण ठिकाणांवरून उचलण्यासाठी 21 रुपये किलो दराने कांदा देऊ केला आहे. यामुळे राज्ये/केंद्रशासित प्रदेश, किमती कमी करण्यासाठी, स्वतः बाजार हस्तक्षेप,किंवा प्रमुख बाजारपेठेत किरकोळ ग्राहकांना किरकोळ दुकानांवारे जारी करण्यासाठी सक्षम होतील. किरकोळ बाजारात समाविष्ट असलेल्या केंद्र किंवा राज्यांच्या एजन्सीजना  21 रुपये प्रति किलो किंवा परिवहन किंमतीसह  साठा उपलब्ध आहे.  सफलने  26 रुपये प्रति किलो देऊ केले आहेत.

किमती माफक राखण्यासाठी, किमती स्थिरीकरण निधीच्या (पीएसएफ) अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाद्वारे  प्रभावी बाजार हस्तक्षेपाच्या उद्देशाने कांद्याचा साठा ठेवला जातो. ठेवला आहे. 2021-22 मध्ये 2 एलएमटी कांदा साठा करण्याचे उद्दिष्ट असताना   एप्रिल ते जुलै 2021 दरम्यान रबी – 2021 पिकातून 2.08  एलएमटी खरेदी करण्यात आला.

त्याचप्रमाणे बटाटा आणि टोमॅटोचे दर माफक ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *