कामगारासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार.

A hospital with at least 30 beds will be set up in each district for the workers – Hasan Mushrif

कामगारासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार – हसन मुश्रीफ

राज्यातल्या प्रत्येक कामगाराला, तसंच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी. अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचं किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणारEmployee State Insurance Corporation (ESIC) आहे. कामगार मंत्री तथा कमर्चारी राज्य विमा महामंडळाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. महामंडळाच्या महाराष्ट्र क्षेत्र प्रादेशिक बोर्डाची 112 वी बैठक काल मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

दहा किलोमिटरपुढे एक रूग्णालय ही अट काढली जाणार असून, आता लोकसंख्या तसंच आवश्यकतेनुसार रूग्णालय उभारलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. 

राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या रूग्णालयांना प्राधान्यानं सर्व सोयीसुविधा देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. आरोग्य मंत्री आणि ई.एस.आय.सी.चे उपाध्यक्ष राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते.

ई.एस.आय.सी.च्या रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची तातडीने भरती करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची संख्या कमी असल्यानं ती तात्काळ भरण्यासाठी एम.पी.एस.सी. प्रमाणे किंवा थेट समुपदेश आणि मेरीट आधारित रिक्त पदावर भरती करण्याचे निर्देश टोपे यांनी यावेळी दिले. आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीनन डॉक्टर्स तसंच नर्सेसची पदं भरावीत, असं त्यांनी सांगितलं

महामंडळाकडे दाव्यांची प्रतिपूर्ती तात्काळ आणि जलदगतीने व्हावी, यासाठी आवश्यक मनुष्यबळाची तात्काळ भरती करण्यात यावी. दावा प्रतिपूर्तीमध्ये तामिळनाडू तसेच केरळ ही राज्ये पुढे असून त्यांनी अवलंबलेली पद्धत घेण्यात यावी. दावा प्रतिपूर्तीची प्रक्रिया 15 दिवसांच्या आत पूर्ण करावी, यासाठी एक निश्चित कार्यशैली तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाची रूग्णालये अधिक सक्षमपणे तसेच सर्व कामगारांना योग्य सुविधा मिळण्यासाठी पीपीपी तत्त्वाचा वापर करावा, आवश्यक वाटल्यास अन्य रूग्णालयांशी टाय-अप करण्यात यावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. चाकण (पुणे), तारापूर (पालघर) आणि पेण (रायगड) येथे ई.एस.आय.ची 3 रूग्णालये उभारण्यास तसेच बुटीबोरी येथील रूग्णालय 3 महिन्यामध्ये उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *