कारगिल विजय दिवस २६ जुलै रोजी होणार साजरा

District Soldier Welfare Officer, Pune जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Kargil Victory Day will be celebrated on the 26th of July

कारगिल विजय दिवस २६ जुलै रोजी होणार साजराDistrict Soldier Welfare Officer, Pune जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीही २४ वा ‘कारगिल विजय दिवस’ सैनिक कल्याण विभागाच्या कार्यालयातील हिरकणी हॉल मध्ये २६ जुलै रोजी सायं. ४ वाजता साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील कारगिल युद्धातील शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व अपंगत्व प्राप्त जवान यांना ‘एस. के. एफ. लिमीटेड’ व ‘बोनीसा वर्ल्ड’ या नामांकित संस्थेकडून ‘भेटवस्तू’ आणि ‘एक इंडिया मिशन रिंग’ देण्यात येणार असून सैनिक कल्याण विभागामार्फत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक विधवा व माजी सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही सैनिक कल्याण विभागाने केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
देशाच्या ‘निर्यात सज्जता निर्देशां’कात महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर
Spread the love

One Comment on “कारगिल विजय दिवस २६ जुलै रोजी होणार साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *