केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते “डेअरी सहकार” योजनेचा प्रारंभ

Amit-Shah-launches the -Dairy Sahakar- scheme

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते “डेअरी सहकार” योजनेचा प्रारंभ.

अमूलच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त अमूलने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी गुजरातमधील आणंद  येथे “डेअरी सहकार” योजनेचा आरंभ  केला.”सहकाराकडून समृद्धीकडे” हे स्वप्न साकार करण्यासाठी भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाद्वारे एकूण 5000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डेअरी सहकार योजना राबविण्यात येणार आहे.Amit-Shah-launches the -Dairy Sahakar- scheme

“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” आणि “आत्मनिर्भर भारत” या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, डेअरी सहकार योजने अंतर्गत, गोवंश विकास, दूध खरेदी, प्रक्रिया, गुणवत्ता हमी, मूल्यवर्धन, ब्रँडिंग, पॅकेजिंग, विपणन, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक आणि साठवणूक, दुग्धजन्य पदार्थांची  निर्यात यासारख्या उपक्रमांसाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या माध्यमातून, सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य दिले जाईल.भारत सरकार आणि/किंवा राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन/विकास संस्था/द्विपक्षीय/बहुपक्षीय सहाय्य/सीएसआर म्हणजेच उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व  यंत्रणेच्या विविध योजनांशी देखील सांगड घालण्यात येईल.

भारत सरकारच्या मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास  मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धविकास  विभाग देखील पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहे.ही ‘डेअरी सहकार’ योजना देशातील दुग्धव्यवसाय क्षेत्राला बळकटी देण्याच्या विद्यमान प्रयत्नांना पूरक ठरेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *