केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्री. 

Ministers

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्री. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल व विस्तार झाला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण 43 मंत्र्यांना शपथ दिली. यात महाराष्ट्रातील एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा एकूण चार मंत्र्यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार समारंभात आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटकपक्षांच्या सदस्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यपदाची शपथ घेतली. यामध्ये 15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीयमंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्र्यांची शपथ. 

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल व विस्तारात आज महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्री पदाची तर खासदार सर्वश्री कपील पाटील, डॉ.भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली.

Ministers
महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्र्यांची शपथ.

माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार नारायण राणे, भिवंडी लोकसभा मतदार संघाचे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार कपील पाटील, दिंडोरी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदार डॉ.भारती पवार आणि नुकतेच राज्यसभेवर निवडून आलेले खासदार डॉ.भागवत कराड पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून कार्यभार पाहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शपथ घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. 

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “आज शपथ घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा देतो. आपण लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि एक मजबूत आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी कार्य करत राहू.” 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *