केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सिटिझन्स टेली-लॉ मोबाईल अॅपचा केला प्रारंभ.
केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी सिटिझन्स टेलि-लॉ मोबाईल अॅप चा प्रारंभ केला.यावेळी त्यांनी टेली-लॉ आघाडीच्या कार्यकर्त्यांचाही सत्कार केला. यावेळी कायदा आणि न्याय राज्यमंत्री प्रा.एस.पी.सिंग बघेल हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम 8 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत न्याय विभागातर्फे साजरा करण्यात येत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचा एक भाग होता.
पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून नव भारत विकसित होत असल्याचे रिजिजू यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत, ई-इंटरफेस प्लॅटफॉर्म टेलि लॉ विकसित करण्यात आला आहे. देशातील खटला दाखल करण्याआधीची यंत्रणा मजबूत करण्याचे हे व्यासपीठ आहे. सबका प्रयास सबका न्याय हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आझादी का अमृत महोत्सवाच्या काळात, सर्वसामान्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांना न्याय सहजप्राप्त राहावा यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्याला संबोधित करताना, किरेन रिजिजू यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या उत्सवाचा भाग म्हणून सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधल्या 75,000 ग्रामपंचायतींमध्ये टेली-लॉच्या विस्ताराची घोषणा केली. कायदेविषयक सहाय्य सेवेच्या दिशेने प्राथमिक पाऊल म्हणून वकिलांनी टेली-लॉ चळवळीत सामील होऊन कायदेविषयक मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचे आवाहन त्यांनी केले.
टेली-लॉ: रिचिंग द अनरिच्ड ई-इंटरफेस प्लॅटफॉर्म हे व्यासपीठ 2017 मध्ये न्याय विभागाकडून देशात खटला पूर्व यंत्रणा मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आले. हे 633 जिल्ह्यांतील 50,000 ग्रामपंचायतींमधील 51,434 सामायिक सुविधा केंद्रांमध्ये कार्यरत आहे.लाभार्थींना त्यांच्या तक्रारीचे लवकरात लवकर निवारण करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वकिलांच्या पॅनलशी जोडण्यासाठी टेली-लॉ तंत्रज्ञानाचा (उदा. टेलि-व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा) लाभ होत आहे.