केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी पुणे आणि सोलापूर रेल्वे परिमंडळांच्या कार्याचा घेतला आढावा.

Union Minister of State for Railways reviewed the work of Pune and Solapur Railway Circles.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी पुणे आणि सोलापूर रेल्वे परिमंडळांच्या कार्याचा घेतला आढावा.Union Minister of State for Railways reviewed the work of Pune and Solapur Railway Circles

पुणे : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी आज पुणे तसेच सोलापूर रेल्वे परिमंडळांच्या अखत्यारीत सुरु असलेली विकास कामे, प्रवाशांसाठी सोयीसुविधा, रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण यासंदर्भातील योजना आणि पायाभूत सुविधा विषयक कामांबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि प्रगतीचा आढावा घेतला.

या बैठकीला पुण्याच्या अपर परिमंडळाचे रेल्वे व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय आणि सोलापूर परिमंडळाचे रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रसिंग परिहार यांच्यासह रेल्वेचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

कोविड-19 महामारीच्या काळात पुणे आणि सोलापूर रेल्वे परिमंडळांनी सुरु केलेल्या विविध उपक्रमांबाबत केंद्रीय राज्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली. सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी रेल्वेचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या  कार्याची तसेच विविध श्रमिक विशेष गाड्यांच्या परिचालनाच्या व्यवस्थेची राज्यमंत्र्यांनी प्रशंसा केली.

त्यांनी या प्रसंगी, स्वच्छता, मालवाहतूकीतून उत्पन्नात वाढ आणि अपारंपरिक स्त्रोतांकडून महसूल मिळवण्याबद्दलच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाची माहिती उपस्थितांना दिली आणि या दिशेने अधिक प्रयत्न करण्यावर भर दिला. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना  उत्तम बाजारभाव मिळवून देण्यासाठी विशेष किसान रेल्वे गाड्या सुरु करून कृषी उत्पादनांना कमीत कमी वेळेत विविध बाजारांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने रेल्वे विभाग करत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

परिमंडळांतील विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अधिक उत्तम सोयीसुविधा निर्माण करण्यासाठीच्या योजनांसाठी संसद सदस्यांकडून खासदार निधीतून भरघोस मदत मिळण्याबाबतही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी भर दिला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *