केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक.

The Prime Minister convened a meeting of the District Collectors to review the implementation of various schemes of the Central Government.

केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक.The Prime Minister convened a meeting of the District Collectors to review

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूर दृश्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.
जिल्ह्यात विविध योजनाना गती देण्याच्या उद्देशानं मोदी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संपर्क असणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात. त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं कार्य केलं तर तो इतिहास बनतो, त्यामुळे नागरिकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा,असं आवाहन त्यांनी केलं.

लोकसहभागातूनही जास्त परिणाम पाहायला मिळतात. तसंच ज्या जिल्ह्यांनी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला आहे. त्याची कामगिरी उत्तम असल्याचं दिसून आलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुढच्या दोन वर्षांसाठी आपआपल्या जिल्ह्यांकरता एक आराखडा निश्चित करावा तसंच कोणतीही दहा काम निश्चित करुन ती पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावं, अशी सूचनाही मोदी यांनी केली. जास्तीत जास्त नागरिकांना उज्वला गॅस, जनधन खातं, विमा योजनाचा लाभ कसा देता येईल याचा प्रयत्न करावा असंही त्यांनी सूचित केलं.
आकांक्षी जिल्ह्यांकडे सरकारचं लक्ष आहे. काही आकांक्षी  जिल्ह्याची गेल्या ४ वर्षात प्रगतीच्या मार्गावर चांगली कामं सुरु आहेत. या जिल्ह्यात जनधन खात्यात चार ते पाच पट वृद्धी झाली असून त्या जिल्ह्यात वीज तसंच शौचालयं मिळाली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व केंद्रीय मंत्रालयं, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री याचं सहकार्य घेऊन आपआपल्या जिल्ह्यांचा विकास साधावा असं आवाहनही, मोदी यांनी केलं. निती आयोगाच्या अहवालानुसार ज्या जिल्ह्यांची प्रगती कमी आहे, त्यांनी विषेष लक्ष पुरवावं. या जिल्ह्यातील प्रशासनाचा एक एक प्रयत्न प्रगतीची नवीन शिखरं गाठेल असंही ते म्हणाले.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *