The doors of Kedarnath temple are open for the darshan of devotees
केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले
हर हर महादेवाच्या जयघोषात उघडले दरवाजे
उत्तराखंड : केदारनाथ धामचे दरवाजे आज सकाळी हजारो भाविक उपस्थित आणि हर हर महादेवच्या जयघोषा उघडण्यात आले. यावेळी शिवनामाच्या जयघोषाने केदारधाम दुमदुमून गेला होता. बाबा केदारनाथ पंचमुखी विग्रह डोली काल केदारनाथ मंदिरात पोहचली. या विशेष कार्यक्रमासाठी जवळपास २०क्विंटल फुलांची आरास करण्यात आली आहे.
आज सकाळी 6.20 वाजता मंत्रोच्चार आणि आर्मी बँडच्या मधुर सुरांनी मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांनी दरवाजे उघडले.
आज सुरूवातीला पुर्वेकडील आणि त्यानंतर पश्चिमेकडील दरवाजा उघडण्यात आला. केदारनाथच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पोहोचले आहेत. या महिन्याच्या २२ तारखेला, अक्षय तृतीयेला गंगोत्री आणि यमुनोत्रीचे पोर्टल उघडून चार धाम यात्रेला राज्यात सुरुवात झाली होती.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com