South Africa failed to take the lead over India in the first innings of the Cape Town Test.
केपटाऊन कसोटीमध्ये पहिल्या डावाअखेर भारतावर आघाडी मिळवण्यात दक्षिण आफ्रिकेला अपयश.
केपटाऊन: येथे सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिला डावात २१० धावांवर बाद झाला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी टिच्चून मारा करत भारताला पहिल्या डावात १३ धावांची आघाडी मिळवून दिली.
दक्षिण आफ्रिकेतर्फे किगन पीटरसनने एकाकी किल्ला लढवत सर्वाधिक ७२ धावा केल्या. तेंबा बवुमा याने २८ तर केशव महाराज ने २५ धावांचे योगदान दिले. यांच्याखेरीज दक्षिण आफ्रिकेच्या इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली.
भारतातर्फे जसप्रीत बुमराह याने अप्रतिम गोलंदाजी करत ४२ गावांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला. मोहम्मद शमीने २ ,उमेश यादवने २ तर शार्दुल ठाकूरने एक गडी बाद केला.
पण दुसऱ्या डावातही भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी विशेष कामगिरी केली नाही. के. एल. राहुल १० तर मयंक अग्रवाल ७ धावांवर बाद झाला.खेळ थांबला तेव्हा भारताच्या २ बाद ५७ धावा झाल्या होत्या.
भारताकडे आता ७० धावां ची आघाडी आहे, विराट कोहली १४ धावा व चेतेश्वर पुजारा ९ धावांवर नाबाद आहे.