कै.अ‍ॅड.विनायक अभ्यंकर चौकाचे नामकरण उत्साहात संपन्न.

कै.अ‍ॅड.विनायक अभ्यंकर चौकाचे नामकरण उत्साहात संपन्न.Late Advocate Vinayak Narhar Abhyankar chowk

पुणे : पुण्यातील ज्येष्ठ वकील, भाजपाचे शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी अध्यक्ष, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. अ‍ॅड. विनायक नरहर अभ्यंकर यांच्या नावाने चौकाचे नामकरण माजी खासदार प्रदीप रावत यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. जुलै 2018 मध्ये अ‍ॅड. अभ्यंकर यांचे दु:खद निधन झाले होते.

प्रभात रस्ता गल्ली क्रमांक 3 च्या जवळ त्यांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या चौकाला अ‍ॅड. अभ्यंकर यांचे नावे आज समारंभपूर्वक देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिध्दार्थ शिरोळे होते.

यावेळी झालेल्या समारंभामध्ये विविध वक्त्यांनी अ‍ॅड. अभ्यंकर यांच्या सामाजिक, राजकीय, न्यायालयीन आणि कौटुंबिक आठवणींना आणि त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी नगरसेविका निलिमा खाडे, माधुरी सहस्रबुध्दे, ज्योत्स्ना एकबोटे, भाजप सरचिटणीस दत्ता खाडे, भाजप शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, माजी विरोधी पक्षनेते श्याम सातपुते, माजी नगरसेवक बाळासाहेब मोकाटे, भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, विश्‍वस्त अ‍ॅड. सदानंद फडके, पुणे मेडिकल असोसिएशनचे डॉ. अविनाश भोंडवे, पुणे बार असोसिएशनचे अ‍ॅड, सतीश मुळीक, डॉ. अनंत रानडे, अभय आपटे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अ‍ॅड. अभ्यंकर यांच्या पत्नी मेघना अभ्यंकर आणि मुलगी सौ. देवयानी प्रसाद कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बगाडे यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *