कोरोनाच्या ओमायक्रॉन या स्वरुपाची लक्षणं सौम्य वाटली, तरी त्यामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण येऊ शकतो.
कोरोनाच्या ओमायक्रॉन या स्वरुपाची लक्षणं सौम्य वाटली, तरी त्यामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण येऊन, आरोग्य आणि वैद्यकीय सेवेत उलथापालथ घडवू शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
ओमायक्रॉनचा प्रसार सहजगत्या होत असल्यानं अनेक देशांमधे महामारीची लाट पुन्हा उसळत आहे.
विशेषतः लसीचं संरक्षण अद्याप न मिळालेल्या लोकांना याचा धोका जास्त असून या महामारीमुळे रुग्णालयं, आणि इतर वैद्यकीय सेवांवर तीव्र ताण येऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.