कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसोबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी साधला संवाद.

District-Collector-Pune

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसोबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी साधला संवाद.

कोरोनामुळे पूर्ण अनाथ झालेल्या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्टेट बँक पुणे येथे आज 28 बालकांचे बँक खाते उघडण्यात आले. यावेळी प्रत्येक बालकांशी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.  District-Collector-Pune

भारतीय स्टेट बँकेत, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी बालकांशी संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, भारतीय स्टेट बँकेचे सहायक प्रबंधक कृष्ण वेणी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्यासह सबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, राज्य शासन तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत आहे. कोणतीही काळजी करू नका, आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर लगेच आमच्याशी संपर्क करा, आम्ही कायम आपल्यासोबत आहोत. आपल्या सर्व अडचणी सोडविण्याच्या सूचना अधिका-यांना देण्यात आल्या आहेत असा आधार देत जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी प्रत्येक बालकाशी संवाद साधला. तसेच कोरोना साथीमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या संरक्षण व संगोपन योग्यरीत्या व्हावे यासाठी अशा बालकांपर्यंत पोहोचून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *