Let’s take a look at the trend of the corona patient population and start school in 15 days – Health Minister.
कोरोना रुग्णसंख्येचा कल पाहून १५ दिवसात शाळा सुरू करण्यासंदर्भात आढावा घेऊ – आरोग्यमंत्री.
मुंबई : राज्यातल्या कोरोना परिस्थिचीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात १५ दिवसात आढावा घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात पालकांमध्ये २ स्वतंत्र मतप्रवाह असल्याचंही ते म्हणाले.
महाराष्ट्रानं केंद्राकडे कोरोना प्रतिबंधक लशींच्या अतिरीक्त मात्रांची मागणी केली होती. मात्र राज्यात लशींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केला होता.
त्याविषयी बोलताना टोपे म्हणाले, महिनाभरासाठी लशींचा साठा उपलब्ध असेल या अनुषंगानं नियोजन केलं जातं. त्यामुळं राज्याला ५० लाख कोविशिल्ड आणि ४० लाख कॉवॅक्सिनच्या मात्रा कमी पडत सांगितलं आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.