कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरित.

Funds of Rs. 38.58 crore distributed to control the spread of Coronavirus.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरित.Maharashtra Govt

मुंबई : राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्‍या विविध उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त पुणे व नागपूर यांना ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

विभागीय आयुक्त पुणे यांना २९ कोटी ९६ लाख रूपये वितरित करण्यात आले असून, या विभागांतर्गत पुणे जिल्ह्याला ९ कोटी ४४ लाख, सोलापूर जिल्ह्याला १० कोटी, सातारा जिल्ह्याला १० कोटी ५२ लाख तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ८ कोटी ६१ लाख रूपये असा एकूण ३८ कोटी ५८ लाख रूपये निधी या जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आला आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निधी मागणीसाठी पुणे, सोलापूर, सातारा व गडचिरोली जिल्ह्यांनी केलेल्या मागणीनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार हा निधी वितरित करण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *